Dapodi : दापोडीतील रेल्वेगेट वर ड्रामा ,महिला विक्रेत्यांचा सरकारी कर्मचार्‍यांवर हल्ला!

महिला सुरक्षा रक्षक प्रिया रमेश राठोड यांच्या गणवेशाची गच्ची पकडून त्यांना अपमानित केले
Dapodi रेल्वेगेट येथे सरकारी कर्मचार्‍यांवर हल्ला: महिला विक्रेत्यांची शिवीगाळ आणि मारहाण

Pimpri Chinchwad: भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दापोडी रेल्वेगेट (Dapodi)येथे सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन विष्णु भारती (वय २५ वर्षे), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, पिंपरीचिंचवड महानगरपालिका, यांनी तक्रार दाखल केली आहे.(Pimpri Chinchwad News Marathi )

घटना १४ जून २०२४ रोजी दुपारी १२:०० वाजता घडली. फिर्यादी सचिन भारती हे रस्त्यावर अनधिकृत विक्री करणार्‍या विक्रेत्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करत असताना आरोपी रेश्मा कांबळे (आरोपी क्र. १) हिने महिला सुरक्षा रक्षक स्वप्नाली पोपट खरमाटे यांना हाताने मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच, रेश्मा कांबळे हिच्या मुलाने (आरोपी क्र. २) महिला सुरक्षा रक्षक प्रिया रमेश राठोड यांच्या गणवेशाची गच्ची पकडून त्यांना अपमानित केले आणि हाताने मारहाण करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला.

या घटनेची नोंद भोसरी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ३५३ (सरकारी कामात अडथळा आणणे), ३५४ (अ) (महिला अस्मितेला धक्का पोहोचविणे), ३२३ (इजा करणे), ५०४ (शांतता भंगासाठी अपमान करणे), ३४ (सामुहिक गुन्हा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment