Pune News : Stay up-to-date with the latest pune news and local news from Pimpri Chinchwad with Pune City Live . Explore latest updates from Politics news, entertainment to crime news.

Kalewadi : काळेवाडी गावठाणमध्ये अज्ञातांची गाडीफोड प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल

पुणे, दि. १०/०७/२०२४: काळेवाडी गावठाणमध्ये अज्ञातांची गाडीफोड प्रकरणी गंभीर गुन्हा नोंदवला गेला आहे. दि. १०/०७/२०२४ रोजी रात्री ००.४५ वाजता साई सलून समोर, श्री गणेश कॉलनी, ज्योतीबानगर, पीसीएमसी शाळेजवळ, काळेवाडी गावठाण येथे हा प्रकार घडला.

गुन्हा दाखल करणाऱ्या सतिश रामकेवल यादव (वय ३० वर्षे, व्यवसाय, रा. श्री गणेश कॉलनी, ज्योतीबानगर, काळेवाडी) यांच्या फिर्यादीनुसार, आरोपी अंशु जॉर्ज किपलिंगकर (वय २३ वर्षे, रा. काळेवाडी), आर्यन रमन पवार (वय १९ वर्षे), आणि करण रवी पटेकर (वय २५ वर्षे) यांनी या घटनेत सहभाग घेतला होता.

घटना स्थळी आरोपींनी मोठमोठ्याने आरडा ओरड करीत गाड्यांच्या काचा फोडत होत्या. फिर्यादीने त्यांना का तोडफोड करीत आहात, असे विचारल्यावर करण पटेकरने फिर्यादीला धमकावत गचांडी पकडून “तु मला ओळखत नाहीस का, मला करण पटेकर म्हणतात,” असे म्हणून, “याला पकडा रे,” असे ओरडले.

त्यानंतर अंशु आणि आर्यन यांनी फिर्यादीला पकडून ठेवले व करणने जबरदस्तीने त्याच्या बरमुडयाच्या उजव्या खिशात हात घालून ६५० रुपये काढून घेतले. फिर्यादीने त्यांना पैसे परत करण्याची विनंती केली आणि गाडीचे नुकसान न करण्याची मागणी केली. परंतु आरोपी करण पटेकरने फिर्यादीच्या गाडीच्या पाठीमागील काचेसमोर सिमेंटचा गड्डू फेकून काच फोडली. आर्यन पवारने तोच सिमेंटचा गड्डू घेऊन गाडीच्या पुढच्या काचेसमारत फोडले. त्याच गड्डून त्यांनी इतर गाड्यांच्या काचाही फोडून नुकसान केले.

याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४), ३(५), ३२४ (४)/(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींच्या विरोधात तपास सुरू केला असून, आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

पुणे सिटी लाइव्ह मीडीया नेटवर्कच्या वाचकांसाठी:
आम्ही तुमच्यासाठी नेहमीच अद्ययावत माहिती देत असतो. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा आणि आपल्या मित्रमंडळी, नातेवाईकांना देखील ही माहिती शेअर करा.


संपर्क:
Pune City Live Media Network
Email: [email protected]
Phone: 8329865383

अधिक माहितीसाठी आणि ताज्या अपडेट्ससाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या.


This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More