पिंपरी-चिंचवड शहरात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कामगार युनियनची बैठक

पिंपरी-चिंचवड शहरात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कामगार युनियनची बैठक

Pimpri-Chinchwad : *उपमुख्यमंत्री ना.अजित (दादा)पवार यांच्या उपस्थितीत पीएमपीएमएल राष्ट्रवादी कामगार युनियनची बैठक*

पिंपरी:-पिंपरी-चिंचवड शहरामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजित (दादा) पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या “संकल्प मेळाव्यास” आले असता राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियन व राष्ट्रवादी कामगार सेल पिंपरी-चिंचवड शहर यांच्या वतीने पीएमपीएमएल कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत पालकमंत्री महोदयांशी सविस्तर चर्चा केली आचारसंहितेपूर्वी कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्याबाबत तात्काळ पीएमपीएमएल समवेत बैठकीचे आयोजन करण्याबाबतचे विनंती करुन मागण्यांचे निवेदन देण्यात आले.पुणे व‌ पिं.चिं.मनपा कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागु करुन सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम ३ टप्यात अदा करण्यात आलेली आहे. ५ ते ७ वर्षांपासून सेवक बदली पदावर कार्यरत आहे त्यांना देखील कंपनी ॲक्टनुसार २४० भरल्यानंतर कायम करणे गरजेचे आहे.पीएमपीएमएल ही दोन्ही शहरांतील जीवनवाहिनी असुन आमचे कर्मचारी देखील प्रमाणिकपणे उत्कृष्ट सेवा देत आहेत.दोन्ही महापालिकेच्या अंदाजपत्रकात प्रत्येक वर्षी पीएमपीएमएल साठी तरतुद करण्यात येते परंतु कामगारांच्या मागण्यांकडे आजतागायत कायम दुर्लक्ष होत असल्याने कामगारांमध्ये असंतोष पसरलेला आहे. आमच्या मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने आंदोलनाचा पवित्रा घेतला की प्रशासनाकडून दडपशाही करुन कारवाईचा इशारा दिला जातो. परंतु पीएमपीएमएल मधील बस ठेकेदारांनी स़ंप केला की, लगेचच निधी उपलब्ध केला जातो. मागील 2 वर्षापासुन हे प्रशासक राजवट असल्याने कामगारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.पीएमपी कर्मचाऱ्यांना सावत्र पनाची वागणुक कशासाठी असा पश्न कर्मचाऱ्यांना‌ पडलेला आहे.

यावर आदरणीय पालकमंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देत बैठक लावण्यात येईल असे आश्वास्त केले.यावेळी माजी शिक्षण समिती सभापती विजय लोखंडे,मा.नगरसेवक प्रसाद शेट्टी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष कविता ताई आल्हाट यांच्या सह पीएमपीएमएल कामगार युनियनचे संतोष शिंदे,दिपक गायकवाड,आनंद महांगडे, अविनाश घोगरे ,प्रफुल्ल शिंदे,अमोल घोजगे पीएमपीएमएलचे बहुसंख्य कामगार बांधव उपस्थित होते. अशी माहिती युनियनचे संतोष शिंदे यांनी दिली.

*प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत:*

१.सातव्या वेतन आयोगाचा ६८ महिन्यांचा फरक मिळणे.

२.७ ते ८ वर्षांपासून कार्यरत असलेल्या बदली सेवकांना कायम करणे.

३.वर्षोनुवर्षे एकाच पदावर सेवा करुन सेवानिवृत्त होणाऱ्या सेवकांना पदोन्नती देणे.

महत्वाच्या या विषयांवर सविस्तर चर्चा करुन बैठक आयोजित करणेबाबतचे निवेदन देण्यात आले.

हे वाचा – Punecitylive.in या आपल्या पुण्यातील वेबसाईट वरती करा तुमच्या ब्रँडची जाहिरात – जाणून घ्या फायदे!

Leave a Comment