Pune News : Stay up-to-date with the latest pune news and local news from Pimpri Chinchwad with Pune City Live . Explore latest updates from Politics news, entertainment to crime news.

Pimpri Chinchwad : १२५ ते १५० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून पिंपरी चिंचवड मधील चैन चोर पकडले !

Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवड पोलीस (Pimpri Chinchwad News Marathi ) आयुक्तालयात चैन चोरीच्या घटना दाखल होत्या.(Pimpri Chinchwad News) त्याबाबत मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे साो, पिंपरी चिंचवड यांनी गुन्हे शाखेतील पथके व युनिट यांना चेन चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना देण्यात आल्या होत्या.(Pimpri Chinchwad News )

चिखली परिसरातील रस्त्याने पायी जाणाऱ्या एकटया महिलांना पाहुन त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी होण्याच्या घटना दिनांक १४/०७/२०२४ व दिनांक १६/०७/२०२४ रोजी घडल्या होत्या. त्याअनुषंगाने गुन्हे शाखेकडील दरोडा विरोधी पथकातील पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, अधिकारी व अंमलदार यांनी चिखली पोलीस ठाणे हद्दीत दोन दिवसामध्ये घडलेल्या घटनास्थळी भेटी देवुन, घटनास्थळ तसेच त्याचे आजुबाजुचे परिसरातील जवळपास १२५ ते १५० सीसीटिव्ही फुटेजची पाहणी करून, संशयीत इसमाचा येण्याचा व जाण्याचा मार्गे काढला असता, सदर इसम हा चिखली परिसरात भरदिवसा एकटा गुन्हे करत असल्याचे निर्देशनास आले.

Jio Mart Job Vacancy Near Me | Career Opportunities with Jio Mart

त्याअनुषंगाने कुदळवाडी व चिखली परिसरात वेगवेगळी पथके तयार करून संशयीत इसमाचा दोन दिवस शोध घेत असताना दिनांक १६/०७/२०२४ रोजी पोलीस उप निरीक्षक गोसावी, पोशि समीर रासकर व अमर कदम यांना एक इसम संशयीतरित्या विनानंबर प्लेट स्प्लेंडर मोटार सायकल वरून कुदळवाडी परिसरात येताना दिसला, त्याचा पाठलाग करून, त्यास शिताफीने ताब्यात घेतले त्याचे नाव मोनुकुमार ललन बिंद, वय २२ वर्षे, रा. पवारवस्ती, चिखली, पुणे मुळगाव गाव सोनहरिया, कलवड, भोलेनाथ मंदिराचे समोर, कोतवाली गाजीपुर, उत्तरप्रदेश असे असल्याचे समजले. व त्याचे ताब्यातील मोटार सायकल ही चोरीचे असल्याचे आढळुन आले. आरोपीचे सीसीटीव्ही फुटेज पाहुन त्याचेकडे बारकाईने विचारपुस केली असता त्याने चिखली परीसरात चैन चोरी केल्याचे आढळुन आले. त्याचे कडे चौकशी करता त्यांनी पुढील गुन्हे केल्याचे कबुल केले.

Jio Mart Job Vacancy Near Me | Career Opportunities with Jio Mart

तसेच त्याचे ताब्यातील चोरीचे मोटार सायकलबाबत अधिक तपास सुरू आहे. नमुद आरोपीस पुढील तपास कामी चिखली पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आले आहेत.

 

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More