---Advertisement---

Pimpri Chinchwad Police Recruitment : पोलीस भरती मुळे येथील वाहतूक व्यवस्थेत बदल !

On: June 17, 2024 11:34 AM
---Advertisement---

Pimpri Chinchwad Police Recruitment 2022-2023 :पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वाहतुक नियंत्रण अधिसूचना

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे आस्थापनेवरील रिक्त पदांची पोलीस भरती २०२२-२०२३ प्रक्रिया पार पडत आहे. सदर भरती प्रक्रियेअंतर्गत उमेदवारांचे शारीरीक मोजमाप व मैदानी चाचणी संत ज्ञानेश्वर क्रिडा संकुल, इंद्रायणीनगर, (Sant Dnyaneshwar Sports Complex, Indrayaninagar)भोसरी येथे दिनांक १९/०६/२०२४ ते दिनांक २४/०६/२०२४ व दिनांक ०१/०७/२०२४ ते १०/०७/२०२४ रोजी दरम्यान पार पडणार असून, सदर ठिकाणी वाहतुक कोंडी होण्याची शक्यता असल्याने वाहतुक बदल करणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र शासन गृह विभाग क्र. एम. व्ही. ए. ०१९६/८७१/सी आर ३७/टी आर ए २, दिनांक २७/०९/१९९६ चे नोटीफिकेशन नुसार मोटार वाहन कायदा कलम ११५, ११६(१) (ए) (बी), ११६ (४) आणि ११७ अन्वये आणि इतर कलमांनी मला अधिकार प्राप्त झाला आहे. त्याअर्थी मी विशाल गायकवाड, पोलीस उप-आयुक्त, वाहतुक शाखा, पिंपरी चिंचवड शहर, यापुर्वी काही निर्बंध असतील ते रद्द करण्यात येत असून खालील प्रमाणे स्वरुपात आदेश निर्गमित करण्यात येत आहेत.

PCMC मध्ये १२ वी पाससाठी मोठी भरती! महिला आणि मुलींसाठी सुवर्णसंधी – २०१ जागांसाठी अर्ज करा!

Jobs: इंटरनॅशनल सिक्युरिटी कंपन्यांमध्ये सुवर्णसंधी: पोलिसांपेक्षा जास्त पगार

2024 मध्ये 12वी पास महिलांसाठी सरकारी नोकऱ्या

 

भोसरी वाहतुक विभाग अंतर्गत:

भोसरी – इंद्रायणीनगर:
इंद्रायणीनगर महादेव मंदिर ते श्री स्वामी समर्थ सी.बी.एस.ई स्कुल गेट नं-२ दरम्यानच्या रस्त्यावर सर्व प्रकारच्या वाहनांना येण्या-जाण्याकरीता मनाई करण्यात येते.

पर्यायी मार्ग:
१. भोसरी तिरुपती (सहारा) चौकाकडून इंद्रायणीनगर स्वीट कॉर्नर चौकाकडे येणारी वाहतुक श्री स्वामी समर्थ सी.बी.एस.ई स्कुल गेट नं २ येथे उजवे बाजुस वळून इंद्रायणीनगर पोलीस वसाहत मिनी मार्केट मार्गे रामकृष्ण मोरे प्रवेश वदारातून बाहेर पडुन इच्छित स्थळी जाते.

पर्यायी मार्ग:
२. भोसरी इंद्रायणीनगर स्वीट कॉर्नर चौकाकडून तिरुपती चौकाकडे जाती वाहतुक महादेव मंदिर येथून डावे बाजूस वळून रामकृष्ण मोरे प्रवेशवदारातून मिनी मार्केटच्या पुढे राकेश स्वीट मार्गे इच्छित स्थळी जाते.

त्याच्या अन्वये सर्व प्रकारच्या वाहनांना (अत्यावश्यक सेवेतील वाहने उदा. फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहीका, इ. वगळून) आवश्यकतेनुसार प्रवेश बंद करण्यात येते आणि नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा.

सदर अधिसूचनेची अमंलबजावणी दिनांक १९/०६/२०२४ रोजी ते दिनांक २४/०६/२०२४ व दिनांक ०१/०७/२०२४ ते दिनांक १०/०७/२०२४ रोजी पहाटे ०

Editorial Team

Pune City Live या वेबसाईटचे आपल्या वेबसाईटसाठी विविध क्षेत्रांतील बातम्या आणि लेख लिहितात. त्यांच्या लेखणीतून पुण्यातील विविध घडामोडी, घडामोडींची विश्लेषणे, तसेच इतर महत्त्वाच्या विषयांवरील माहिती वाचकांपर्यंत पोहोचवली जाते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment