पुणे: लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध, नंतर ‘जात वेगळी’ असल्याचे सांगून फसवणूक; आरोपीला अटक

0
jpeg (18)

पुणे: लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध, नंतर ‘जात वेगळी’ असल्याचे सांगून फसवणूक; आरोपीला अटक
पुणे: हिंजवडी परिसरात लग्नाचे खोटे आश्वासन देऊन एका तरुणीसोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा आणि नंतर ‘तुझी जात वेगळी आहे’ असे सांगून तिची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

ही घटना मार्च २०२५ ते ०८/०८/२०२५ या कालावधीत नेरे दत्तवाडी, ता. मुळशी येथे घडली. आरोपी सुनील शालीकराम पराळे (वय २६) याची ओळख फिर्यादी महिलेसोबत एका कंपनीत काम करताना झाली होती. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाल्यावर आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन केला.

या विश्वासाचा फायदा घेऊन आरोपीने फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवले आणि तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. मात्र, नंतर लग्न करण्यास नकार देताना, ‘तुझी जात वेगळी आहे’ असे म्हणून त्याने तिची फसवणूक केली.

या प्रकरणी फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून हिंजवडी पोलीस ठाण्यात आरोपी सुनील पराळेविरोधात फसवणूक, लैंगिक अत्याचार आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Pune: Sexual intercourse on the pretext of marriage, then fraud by saying ‘different caste’; Accused arrested

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed