आज सायंकाळी पाच वाजता संगमपूल येथे संत तुकाराम महाराज पालखीचं आगमन झाले. ही पालखी देहू वरून सुरू होऊन पंढरपूरच्या दिशेने जात आहे. पालखीच्या स्वागतासाठी भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संत तुकाराम महाराजांची पालखी वर्षानुवर्षे आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरला जाते. या पवित्र यात्रेमध्ये भक्तगण उत्साहाने सहभाग घेतात आणि विठ्ठलभक्तीच्या जल्लोषात पालखीचे स्वागत करतात.
पालखी मार्गात भक्तांची गर्दी आणि विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. पालखीच्या स्वागतासाठी पुष्पवृष्टी आणि भजन कीर्तनाच्या कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय झाले होते.
ताज्या घडामोडी आणि माहिती मिळवण्यासाठी, पुणे सिटी लाईव्ह मीडियाशी संपर्क साधा:
ईमेल: [email protected]
फोन: 8329865383