हडपसर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या घरफोडी व फसवणूक मुद्देमाल मूळ मालकांना परत !
हडपसर पोलीसांनी बारा लाख रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत केला
पुणे, हडपसर: हडपसर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या घरफोडी व फसवणूक अशा १० गुन्ह्यांच्या तपासात हडपसर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने कौशल्यपूर्ण तपास करून गुन्हेगारांना जेरबंद केले आहे. या तपासाच्या दरम्यान जप्त केलेला एकूण १२,३२,२०० रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत करण्यात आला आहे.
पोलीसांनी गुन्ह्यांमधून जप्त केलेले सोन्याचे दागिने वजन १९९ ग्रॅम ४८० मिली, चांदीचे दागिने वजन ६०० ग्रॅम, रोख ५०,००० रुपये आणि इतर साहित्य असे एकूण १२,३२,२०० रुपयांचे मुद्देमाल परत केला आहे. हा मुद्देमाल हडपसर विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त श्रीमती अश्विनी राख यांच्या हस्ते २८ जून २०२४ रोजी मूळ मालकांना परत करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे आयोजन हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष पांढरे, पोलीस निरीक्षक गुन्हे श्रीमती मंगल मोढवे, पोलीस उपनिरीक्षक तपास पथक श्री. महेश कवळे, मुद्देमाल विभागाचे म. पोलीस हवा. एस.एस. म्हांगरे, पोलीस हवा भोसले, म.पो.ना सुर्यवंशी यांच्या प्रयत्नांमुळे करण्यात आले.
फिर्यादींनी हडपसर पोलीस ठाण्याचे आभार मानले आहेत. त्यांनी आपले चोरीस गेलेले सोन्याचांदीचे दागिने परत मिळवून दिल्याबद्दल पोलीसांचे कौतुक केले आहे.
ताज्या घडामोडी आणि माहिती मिळवण्यासाठी, पुणे सिटी लाईव्ह मीडियाशी संपर्क साधा:
ईमेल: [email protected] फोन: 8329865383