Pune: झारखंड चे मोबाइल चोर आता पुण्यात , कात्रज बस स्टॉपच्या भागात मोठी कारवाई!
Pune परराज्यातील मोबाईल चोरट्यास अटक: ७५,०००/- रुपयांचे चार मोबाईल फोन जप्त
पुणे: भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस अंमलदार चेतन गोरे, हनमंत मासाळ, सतिश मोरे, तसेच कात्रज मार्शलकडील सचिन पवार आणि विठ्ठल चिपाडे हे कात्रज बस स्टॉपच्या भागात पेट्रोलिंग करीत असताना एक मोठी कारवाई केली.
दिनांक २१ जून २०२४ रोजी, मोरे बाग बस स्टॉपवर दोन मोबाईल चोरांबद्दल खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर, पोलीस पथकाने तात्काळ कारवाई केली. त्यांनी इसम गणेशकुमार गोगा महतो, वय १९ वर्षे, रा. तीन पहाड, बहपुर, ठाणा राजमहल, जिल्हा साहेबगंज, राज्य झारखंड आणि एक विधीसंघर्षित बालक यांना पकडले. त्यांच्या अंगझडतीत ७५,०००/- रुपयांचे चार चोरीचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले.
उघडकीस आलेले गुन्हे
१. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ५२२/२०२४ भांदंवि कलम ३७९ २. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ५२५/२०२४ भांदंवि कलम ३७९ ३. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ५२६/२०२४ भांदंवि कलम ३७९ ४. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ५२८/२०२४ भांदंवि कलम ३७९
पोलीसांनी गणेशकुमार गोंगा महतो यास अटक केली असून, पुढील तपास सुरु आहे.