वाहतूक सुरळीतपणे चालण्यासाठी आणि कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने वाहतूक व्यवस्थेत काही तात्पुरते बदल केले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या नोटीफिकेशन नुसार, मोटार वाहन कायद्याच्या कलमांचा वापर करून, पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त रोहिदास पवार यांनी खालील बदल जाहीर केले आहेत.
संत श्री. तुकाराम महाराज पालखी मार्गासाठी वाहतूक बंद रस्ते आणि पर्यायी मार्ग:
१. आकुर्डी येथून निघून चिंचवड, पिंपरी, वल्लभनगर, नाशिक फाटा, फुगेवाडी, दापोडी, हॅरीस ब्रिज, बोपोडी चौक, खडकी रेल्वे स्टेशन, मरिआई गेट चौक, वाकडेवाडी पाटील इस्टेट चौक, इंजिनिअरींग कॉलेज चौक या मार्गांवर वाहतूक तात्पुरती बंद करण्यात येणार आहे.
२. बोपोडी चौक ते चर्च चौक, पोल्ट्री फार्म चौक, मुळा रोड ते कमल नयन बजाज उद्यान चौक, आर.टी.ओ. चौक ते इंजिनिअरींग कॉलेज चौक, सादलबाबा दर्गा ते पाटील इस्टेट चौक या रस्त्यांवर वाहतूक बंद करण्यात येईल.
पर्यायी मार्ग:
१. बोपोडी चौक ते खडकी बाजार या अंतर्गत रस्त्याने चर्च चौक पर्यंत जाऊ शकता. २. चर्च चौक, भाऊ पाटील रोड, बेमेन चौक औंध रोड या मार्गे वाहनचालकांना पर्यायी मार्ग देण्यात आला आहे. ३. रेल्वे पोलीस मुख्यालयासमोरून औंध रोड मार्गे ब्रेमेन चौक, अंतर्गत रस्त्यांचा वापर करावा.
वाहनचालकांनी या सूचनांचे पालन करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, जेणेकरून पालखी सोहळा सुरळीतपणे पार पडू शकेल.
रोहिदास पवार, पोलीस उप आयुक्त, वाहतूक शाखा, पुणे शहर