---Advertisement---

Pune traffic police : मोदीबाग परिसरात वाहतूक सुरळीत करण्यासाठी विश्रामबाग वाहतूक विभागाचे नो पार्किंग आदेश लागू

On: July 21, 2024 2:18 PM
---Advertisement---

पुणे शहर वाहतूक पोलीस (@PuneCityTraffic) / Xविश्रामबाग वाहतूक विभागात नो पार्किंगचे आदेश: मोदीबाग परिसरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निर्णय

पुणे, १९ जुलै २०२४: पुणे शहरातील विश्रामबाग वाहतूक विभागांतर्गत (Pune traffic police ) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यालय, मोदीबाग, शनिवार पेठ हे महत्वाचे आणि संवेदनशील ठिकाण आहे. येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यक्रमांचे आयोजन होत असते. मा. सर संघचालक त्यांच्या मुक्कामासाठी येथे येत असतात. यामुळे या ठिकाणी येणारे ग्राहक आपली वाहने आजूबाजूच्या इमारतीसमोर पार्क करतात, ज्यामुळे वाहतूक कोंडी होते.Pune traffic police

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे चालण्यासाठी, महाराष्ट्र शासन गृह विभाग क्र. एम. व्ही. ए. ०१९६/८७१/सीआर- ३७/टीआरए २, दिनांक २७/०९/१९९६ चे नोटीफिकेशननुसार मोटार वाहन कायदा कलम ११५, ११६ (१) (ए) (बी), ११६ (४) आणि ११७ अन्वये मला प्राप्त अधिकाराचा वापर करुन, मी रोहिदास पवार, पोलीस उपआयुक्त वाहतूक शाखा, पुणे शहर, विश्रामबाग वाहतूक विभागातील खालील नमूद रस्त्यावर दि. १९/०७/२०२४ पासून तात्पुरत्या स्वरुपात खालील प्रमाणे आदेश निर्गमित करीत आहे:

 

 

 

  1. नामदेव राऊत पथ: सिध्दीविनायक अभ्यासिका ते अहिल्यादेवी चौक (अंतर ५० मिटर) रस्त्याच्या दोन्ही बाजूंना नो पार्किंग करण्यात येत आहे.
  2. दिवाकर पथ: बालाजी भेळ व पाणीपुरी ते माधव बिल्डिंग (अंतर ४० मिटर) रस्त्याच्या दोन्ही बाजूंना नो पार्किंग करण्यात येत आहे.

हे आदेश तात्पुरते असून, सदर निर्णयामुळे परिसरातील वाहतूक व्यवस्थापन सुधारेल अशी अपेक्षा आहे. व्यावसायिक दुकानदार आणि येणाऱ्या ग्राहकांनी या आदेशाचे पालन करणे आवश्यक आहे, अन्यथा योग्य कायदेशीर कारवाई केली जाईल.

 

Editorial Team

Pune City Live या वेबसाईटचे आपल्या वेबसाईटसाठी विविध क्षेत्रांतील बातम्या आणि लेख लिहितात. त्यांच्या लेखणीतून पुण्यातील विविध घडामोडी, घडामोडींची विश्लेषणे, तसेच इतर महत्त्वाच्या विषयांवरील माहिती वाचकांपर्यंत पोहोचवली जाते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment