Pune News: ‘वॉन्टेड’ कामवाली ला अटक! सोसायटीमधून दागिने चोरून पळून जायची हि मोलकरीण !

सोसायटीमधून दागिने चोरून पळून जायची हि मोलकरीण

Pune News:सोसायटीमध्ये मोलकरीणचे काम घेऊन घरे लुटणारी महिला अटक!

कल्याणीनगर: पुण्यातील (Pune )कल्याणीनगर येथील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये घरात मोलकरीण म्हणून काम करत असलेल्या महिलेने घरातील मालकांचे १३.३६ लाख रुपये किंमतीचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.(Pune News ) याप्रकरणी येरवडा पोलिसांनी त्वरित कारवाई करून आरोपी महिलेला अटक केली आहे.

आरोपी महिलेने कशी केली चोरी?

आरोपी महिला दिनांक २८ मे २०२४ रोजी कल्याणीनगरमधील एका सोसायटीमध्ये मोलकरीण म्हणून काम करत होती. तिने सोसायटीतील एका घरात प्रवेश करून घरातील कपाटातून दागिने चोरून नेऊन ते विकले आणि मिळालेले पैसे स्वतःच्या वापरासाठी खर्च केले.

देवाला बोकड कापल्यानंतर परतत असताना पिकअप अपघात, १३ जण जखमी, ६ गंभीर

पोलिसांनी त्वरित कारवाई करून आरोपी महिलेला अटक केली. तसेच, तिने आंबेगाव परिसरातील एका घरातूनही चोरी केल्याची कबुली दिल्याने त्या गुन्ह्यातही तिला अटक करण्यात आली. या दोन्ही गुन्ह्यांमधून मिळून २ लाख रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे.

पोलिसांनी या यशस्वी कारवाईसाठी मा. पोलीस उपायुक्त, परिमंडळ ४ श्री. विजयकुमार मगर, मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, श्री. विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाचे आभार मानले. तसेच, तपास पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

या घटनेमुळे नागरिकांनी घरात कोणाला कामाला ठेवतो त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. शक्यतो, विश्वासू आणि ओळखीचे व्यक्तीच कामाला ठेवावेत.

Leave a Comment