Pune जमीन खरेदी-विक्री करणाऱ्यांसाठी खुशखबर! आता शनिवार-रविवारीही सुरु राहणार कार्यालये!

पुणे : जमीन खरेदी-विक्री करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता शनिवार आणि रविवारीही उपनिबंधक कार्यालये सुरू राहणार आहेत. या निर्णयामुळे नागरिकांना त्यांच्या सोयीनुसार जमीन खरेदी-विक्रीची कामे करता येतील. महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे जमीन खरेदी-विक्री करणाऱ्यांनी स्वागत केले आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या निर्णयाची माहिती दिली. ते म्हणाले … Read more

पुण्यातील नोकरी कोरोनामुळे गेली; गाव गाठून शेती सुरु केली अन् लाखोंचं उत्पन्न कमावलं

पुण्यातील नोकरी कोरोनामुळे गेली; गाव गाठून शेती सुरु केली अन् लाखोंचं उत्पन्न कमावलं धाराशीव, 11 ऑक्टोबर 2023: धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एकुरका गावचे अमोल राजाभाऊ यादव यांना कोरोनामुळे पुण्यातील नोकरी गेल्यावर त्यांनी गाव गाठून शेती सुरु केली. आता ते केळीच्या शेतीतून लाखोंचं उत्पन्न कमवत आहेत. अमोल यांना जन्मापासूनच एक पाय अपंग आहे. त्यांनी नववीपर्यंत शिक्षण … Read more

पिंपरी-चिंचवड पोलीस उपनिरीक्षकाला ड्रीम ११ मध्ये दीड कोटींचे बक्षीस

पिंपरी-चिंचवड, 11 ऑक्टोबर 2023: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांना ड्रीम ११ मध्ये दीड कोटी रुपयांचे बक्षीस लागले आहे. झेंडे हे पिंपरी-चिंचवड पोलीस मुख्यालयात कार्यरत आहेत. त्यांनी बांगलादेश विरुद्ध इंग्लंड या क्रिकेट सामन्यावर ड्रीम इलेव्हन टीम लावली होती. झेंडे यांनी सांगितले की, सध्या एक दिवसीय विश्वचषक सुरू आहे आणि आपण तो रेग्युलरी पाहतो. तसंच … Read more

पुणे महानगरपालिका सामान्य प्रशासन विभागात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

पुणे, १० ऑक्टोबर २०२३: पुणे महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये वरिष्ठ डेटाबेस अभियंता, डेटाबेस प्रशासक, सॉफ्टवेअर अभियंता आणि सॉफ्टवेअर अभियंता (पेमेंट सेवा) या पदांसाठी भरती होणार आहे. पदाचे नाव पद संख्या वरिष्ठ डेटाबेस अभियंता 01 डेटाबेस प्रशासक 01 सॉफ्टवेअर अभियंता 01 सॉफ्टवेअर अभियंता (पेमेंट सेवा) 01 शैक्षणिक पात्रता … Read more

Pune Gas leakage: पुण्यात स्विमिंग पूलमध्ये क्लोरीन गॅसगळती, २२ जणांना श्वास घेण्यास त्रास

पुणे, १० ऑक्टोबर २०२३: पुण्यातील पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील कासारवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलावात आज सकाळी क्लोरीन गॅसगळती झाली. यामुळे २२ जणांना श्वास घेण्यास त्रास झाला. त्यापैकी काही जण बेशुद्ध पडले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बेशुद्ध पडलेल्या आणि श्वास घेण्यास त्रास होणाऱ्यांना तात्काळ वैद्यकीय उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात … Read more

Pune Gold :सोनेदरात १५ दिवसांनंतर वाढ; दसरा-दिवाळीतही वाढीचाच कल सोने दरात १५ दिवसांनंतर वाढ; दसरा-दिवाळीतही वाढीचाच कल

मुंबई, 10 ऑक्टोबर 2023 – सराफा बाजारात सोनेदरात आज १५ ते १६ दिवसांनंतर एक तोळ्यामागे (१० ग्रॅम) ३०० रुपयांची वाढ नोंदविण्यात आली. आज सोन्याचा भाव २२ कॅरेट ५९,९२२ रुपये प्रति तोळा आणि २४ कॅरेट ६१,४२२ रुपये प्रति तोळा इतका आहे. कुठल्याही विशेष कारणाशिवाय सोनेदरात आज ही वाढ झाली आहे. मात्र, दसरा, दिवाळी सणांच्या काळातही सोने … Read more

पुणेकरांकडून रस्ते अडवण्यास आणि साउंड सिस्टीमच्या भिंती उभारण्यास विरोध

पुणे, १० ऑक्टोबर २०२३ – फक्त गणेशोत्सवच नव्हे तर प्रत्येक सण, जयंती, पुण्यतिथीनिमित्त रस्ते अडवले जात आहेत. साउंड सिस्टीमच्या भिंती उभारून दणदणाटाने सर्वसामान्य नागरिक, वयस्कर आणी आजारी नागरिकांचा शांतीपूर्वक जगण्याचा हक्क हिरावून घेतला जात आहे. या विरोधात जागृत पुणेकर म्हणून कायदेशीर मार्गाने लढा देण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली जाणार आहे. या याचिकेत रस्ते … Read more

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, पुण्यातून आणखी एक विशेष गाडी सुरू !

Good news for railway passengers, another special train from Pune!   पुणे, 07 ऑक्टोबर 2023: रेल्वे प्रशासनाने पुणे-हरंगुळ-पुणे दरम्यान विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी 10 ऑक्टोबरपासून 31 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. गाडी क्र. 01487 पुणे – हरंगुळ एक्स्प्रेस पुण्याहून दररोज सकाळी 6.10 वाजता सुटेल आणि दुपारी 12.50 वाजता हरंगुळला पोहोचेल. मार्गात ही गाडी … Read more

ड्रग माफिया ललित पाटील ससून रुग्णालयातून असा पळाला

पुणे, 5 ऑक्टोबर 2023: पुण्यातील प्रसिद्ध ड्रग माफिया ललित पाटील काल (4 ऑक्टोबर) रात्री ससून रुग्णालयातून पळाला. पाटील याला एका गुन्ह्यात अटक करण्यात आली होती आणि त्याचे आज (5 ऑक्टोबर) सकाळी आॅपरेशन होणार होते. मात्र, रात्रीच्या सुमारास त्याने रुग्णालयातील सुरक्षिततेला चकमा देत पळ काढला. पाटील याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो … Read more

धुरळा उडणार ! पुणे जिल्ह्यातील 388 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर

पुणे जिल्ह्यातील 388 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर पुणे, 4 ऑक्टोबर 2023: पुणे जिल्ह्यातील 388 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या निवडणुका 20 ऑक्टोबर 2023 रोजी होणार आहेत. निवडणूक आयोगाने आज निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. यानुसार, अर्ज भरण्याची प्रक्रिया 8 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 14 ऑक्टोबर आहे. उमेदवारी अर्जांची छाननी 15 ऑक्टोबर रोजी … Read more