Ultra Jhakaas OTT : अल्ट्रा झकास ओटीटीवर सप्टेंबरमध्ये दोन रहस्यमय मराठी चित्रपट

Ultra Jhakaas OTT:  गूढ, गुपितं, रहस्य आणि या अशा रहस्यांनी तुडुंब भरलेल्या कथा आणि त्यांचा होत जाणारा उलगडा नेहमीच आपल्याला रोमांचकारक अनुभव देत असतो. अशाच रहस्यांनी भरलेले ‘सिमर’ आणि ‘लिपस्टिक मर्डर’ (Simmer’ and ‘Lipstick Murder) हे दोन मराठी डब चित्रपट ‘अल्ट्रा झकास’ या ओटीटीच्या माध्यमातून सप्टेंबर महिन्यात रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहचणार आहेत.

‘सिमर’ची कथा एका हॉटेलमधल्या एका तरुण आचाऱ्याची आहे. त्याच्या कुटुंबासाठी मोठ्या रकमेची गरज असते. तेव्हा त्याचा मालक त्याला मोठी रक्कम मिळवण्याची एक संधी देतो. हॉटेलचे काम झाल्यानंतर एक विशिष्ट पेटी रोज एका विशिष्ट ठिकाणी पोहचवणे, परंतू त्यात एक अट आहे की, ती पेटी चुकूनही उघडायची नाही. पेटी आणि पेटीमधील अदृश्य गुपिताभोवती ‘सिमर’ची कथा फिरते.

हे वाचा – Teachers’ Day 2023 : ५ सप्टेंबरला का साजरा करतात? जाणून घ्या रंजक कारण

दुसरीकडे, ‘लिपस्टिक मर्डर’ची कथा एका सिरीयल किलरच्या केसची आहे. इन्स्पेक्टर राज एका सिरीयल किलरच्या केसचा तपास करत आहे. तो अधिक तपास करत असताना, एका मुलीच्या प्रेमात पडतो पण ज्या केसचा तो तपास करत आहे, त्या केसचा मुख्य आरोपी ती मुलगीच निघाली तर?

‘अल्ट्रा झकास’वर आजवरच्या दर्जेदार चित्रपटांबरोबरच सप्टेंबर महिन्यात ‘लिपस्टिक मर्डर’ आणि ‘सिमर’ या दोन दर्जेदार रहस्यमय मराठी डब चित्रपटांचा समावेश करून आम्ही प्रेक्षकांच्या मनोरंजनात भर घालत आहोत. आशा आहे कि या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा खूप प्रतिसाद आणि प्रेम मिळेल” अशी भावना अल्ट्रा मिडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लिमिटेडचे सी.इ.ओ. श्री सुशीलकुमार अग्रवाल यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनासंदर्भात व्यक्त केली.

‘सिमर’ आणि ‘लिपस्टिक मर्डर’ हे दोन्ही चित्रपट सप्टेंबर महिन्यात ‘अल्ट्रा झकास’वर प्रदर्शित होतील.

Join Buttons Join WhatsApp Group Join Telegram Channel

Leave a Comment