कांदा अनुदान योजना 2023 : महाराष्ट्र हे एक कृषी योजना आहे ज्यामध्ये राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात येईल. या योजनेत राज्यातील खाजगी बाजार समिती, संबंधित कृषी उत्पन्न बाजार समिती आणि थेट पणन अनुज्ञप्तीधारकांची मदत केली जाईल.
या योजनेत, राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिनांक 1 फेब्रुवारी 2023 ते दिनांक 31 मार्च 2023 या कालावधीत संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये, खाजगी बाजार समितीमध्ये, थेट पणन अनुज्ञप्तीधारकाकडे अथवा नाफेडकडून लेट खरीप कांदा खरेदीकरीता उघडण्यात आलेल्या खरेदी केंद्रांमध्ये विक्री केलेल्या शेतकऱ्यांना अनुदान दिला जाईल.