पुण्यात दहशत माजवणारे अट्टल गुन्हेगार एक वर्षासाठी हद्दपार !

पुणे पोलीस
पुणे पोलीस

पुणे:  पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी अट्टल गुन्हेगार वैभव शैलेश गायकवाड उर्फ कुणाल गौतम कावरे याला एक वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे. गायकवाड हा चंदननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हे करणारा एक अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने त्याच्या साथीदारांसह चंदननगर, विमानतळ आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत लोखंडी रॉड, सत्तुर आणि कोयता यासारख्या जीवघेण्या घातक हत्यारांसह गंभीर दुखापतीसह दरोडा, जबरी चोरी, घातक शस्त्राने गंभीर दुखापत करणे, घातक शस्त्राने दुखापत करणे, दंगा आणि बेकायदेशीर हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत.

हे वाचा – घरी बसूनच मेहंदी आर्टिस्ट शोधू शकता आणि तुमच्या आवडीनुसार डिझाइन बुक करू शकता.

मागील पाच वर्षात गायकवाडविरुद्ध सहा गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे सदर परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे आणि मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते.

प्राप्त प्रस्ताव आणि सह-कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर, पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी गायकवाडला एक वर्षासाठी नागपूर मध्यवर्ती कारागृह, नागपूर येथे स्थानबद्ध करण्याचे आदेश पारित केले. गायकवाडला स्थानबद्ध करण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे आणि पोलीस उप-निरीक्षक राजू बहिरट, पीसीबी गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी मदत केली.

हे वाचा – वन विभागात नोकरी लावून देतो, मी अधिकारी आहे !

पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दहशत निर्माण करणाऱ्या आणि सक्रिय अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यांनी कार्यभार स्विकारल्यानंतरची ही एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेची 37वी कारवाई आहे. पुढेही सराईत आणि अट्टल गुन्हेगारांचे कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.

Leave a Comment