
शिवरायांनी आदिलशहा बरोबर तह कसा केला?
शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने पाठवलेला सिद्धी जोहरने पन्हाळगडाला वेडा घातला होता त्याचवेळी मुगल सम्राट औरंगजेब याने त्यांच्यावर चाल करण्यासाठी शाहिस्तेखानाला पाठवले वेढ्यातून सुटका करून महाराज विशाळगडावर पोहोचले त्यावेळी शाहिस्तेखानाने पुणे प्रांतावर स्वारी केली एकाच वेळी आदिलशाही आणि प्रबळ मुघलशाही या दोन सत्यांशी लढा देणे योग्य नाही होणार नाही हे लक्षात घेऊन शिवरायांनी आदिलशहा बरोबर तह केला