Pune News : Stay up-to-date with the latest pune news and local news from Pimpri Chinchwad with Pune City Live . Explore latest updates from Politics news, entertainment to crime news.

शेतमालाच्या किमान आधारभूत किंमतीत (एमएसपी) मोठी वाढ , यावर्षी मुगाला सर्वाधिक भाव !

A big increase in the minimum base price (MSP) of agricultural products!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने (सीसीईए) विपणन हंगाम 2023-24  साठी सर्व अनिवार्य खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किंमतींमध्ये (एमएसपी) वाढ करायला मंजुरी दिली आहे.

उत्पादकांना त्यांच्या उत्पादनासाठी फायदेशीर भाव मिळावा हे सुनिश्चित करण्यासाठी आणि पीक विविधतेला प्रोत्साहन मिळावे, यासाठी खालील तक्त्यामध्ये दिल्याप्रमाणे सरकारने विपणन हंगाम 2023-24 साठी खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये  वाढ केली आहे :

विपणन हंगाम 2023-24साठी सर्व खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किंमत 

(₹ प्रति क्विंटल)

पिकेहमीभाव 2014-15हमीभाव 2022-23हमीभाव 2023-24खर्च * खरीप  विपणन हंगाम

2023-24

2022-23 मधील हमीभावामध्ये मध्ये वाढखर्चावरील लाभ टक्क्यांमध्ये
  धान – सामान्य –136020402183145514350
धान -श्रेणी  अ140020602203143
ज्वारी – संकरित153029703180212021050
ज्वारी – मालदांडी155029903225235
बाजरी125023502500137115082
नाचणी155035783846256426850
मका131019622090139412850
तूर / अरहर435066007000444440058
मूग460077558558570580350
उडीद435066006950459235051
भुईमूग400058506377425152750
सूर्यफूल बिया375064006760450536050
सोयाबीन (पिवळे)256043004600302930052
तीळ460078308635575580550
कारळे360072877734515644750
कापूस (मध्यम धागा  )375060806620441154050
कापूस (लांब धागा  )405063807020640

*यात ज्या खर्चाचा संदर्भ देण्यात आला आहे  त्यात मानवी मजुरी , बैलांची मजुरी /यंत्र मजुरी, भाडेतत्वावर घेतलेल्या जमिनीचे  भाडे, बियाणे, खते , अवजारे यावरील खर्च , सिंचन शुल्क, आणि शेत बांधणीवरील घसारा, खेळत्या भांडवलावरील व्याज, पंप संच चालवण्यासाठी डिझेल/वीज इ.,विविध खर्च आणि कौटुंबिक श्रमाचे  मूल्य.यासाठीचे सर्व देय खर्च समाविष्ट असतात

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More