पुणे,दि.13 डिसेंबर2023: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (CBSE) दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.या परीक्षांचा कालावधी 15 फेब्रुवारी 2024 te 10 एप्रिल 2024 असणार आहे.
परीक्षांचे वेळापत्रक मिळाल्याने विद्यार्थी आता अभ्यासाचे नियोजन करून परीक्षाची तयारी करू शकतात.वेळापत्रक मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. आतापासून योग्य नियोजन पद्धतीने अभ्यास केल्यास मुलांना परीक्षेत घवघवीत यश नक्कीच मिळू शकते.
नवीन वर्षाचे आगमन होताच अवघ्या काही दिवसातच दहावी व बारावीच्या परीक्षा असतात.यावर्षी सुद्धा मुलांचा उत्साह वेगळाच आहे. वर्षभर मुले अभ्यास करतात परंतु वेळापत्रक जाहीर होताच अभ्यासाचं वेळापत्रक ठरवून विद्यार्थी त्या प्रमाने अभ्यास करतात. त्यामुळे आता सिबीएससी काढून वेळापत्रक जाहीर झाल्याने विद्यार्थी परीक्षांच्या तयारीत जोमाने लागले आहेत.
डेडशीट अशा पद्धतीनं डाउनलोड करा.
सिबीएससी बोर्ड परीक्षेची डेडशीट डाउनलोड करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईटवरती जा.त्यानंतर 10 वी आणि 12वीच्या डेडशीट साठी लिंकवर लेटेस्ट अपडेट साठी क्लिक करा.नंतर क्लासच्या लिंकवर जाऊन बोर्ड परीक्षेच्या पीडीएफ लिंकवरती क्लिक करून लिंक डाउनलोड करा. या स्टेप्स फॉलो करून तुम्ही डेडशीट डाउनलोड करू शकता.
हे वाचा:
अशा पद्धतीनं करा परीक्षांसाठी विषयांचे वेळापत्रक.
• परीक्षांना किती दिवस राहिले त्याप्रमाणे दिवस मोजुन घ्या.
• विषयांनुसार प्रत्येक विषयाला ठराविक वेळ द्या.
ठराविक वेळेनुसार अभ्यास झाला पाहिजे याची काळजी घ्या.
• आलेल्या अभ्यासाला रीव्हिजण द्या म्हणजे अभ्यास लक्षात राहील .
• स्वतःवर आत्मविश्वास ठेवा.