पुणे,10 डिसेंबर,2023: मराठा आरक्षणावरून सध्या राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते चंदकांत भुजबळ व मराठा आरक्षण कार्यकर्ता मनोज जरांगे यांच्यात टोलेबाजी चालु आहे.
नारायण कुचेंवर टिका करणारी ऑडिओ क्लिप दाखवत जारांगे पाटील हे दिव्यांग आहेत, असं संतप्त वक्तव्य भुजबळांनी केले आहे.जरांगेच नामोनिशाण नसताना मी 1985 साली मुंबईचा महापौर व आमदार पदाचा भार सांभाळत होतो, तू ग्रामपंचायतीचा सरपंच तरी होऊन दाखव असे म्हणत त्यांनी जरांगे पाटलांवर निशाणा साधला आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
जरांगे हे सरसकट कुनबी प्रमाणपत्र देण्याची मागणी करत आहेत तर भुजबळांचा याला विरोध आहे. मराठ्यांकडे 20 टक्के जागा तर आमच्याकडे 80 टक्के मतं आहेत. OBC समाजाला सरकारी नोकऱ्या फक्त 9 टक्के मिळाल्यात तसेच प्रत्येक जमातीत ब्रॅकेट आहे.आधी तुम्ही 21 टक्के जागा भरा असे आवाहन भुजबळांनी मनोज जारांगेंना केलं आहे. तसेच त्यांच्या सभा रात्री उशिरापर्यंत चालतात,कायद्याची भीती जशी आम्हाला आहे तशीच त्यांना का नाही असं प्रश्न त्यांनी विचारला. याला प्रतिउत्तर देत ‘आरक्षण मिळू द्या मग भुजबळांना बघतो असा टोला मनोज जरांगेनी छगन भुजबळांना दिला आहे.