
‘जिंगल बेल्स जिंगल बेल्स’ या गाण्याचे म्यूझिक एकत जगभर आनंदात साजरा केला जानारा ‘ख्रिसमस’ व मुलांना आवडणारा ‘सांताक्लॉज’ यांच काय नातं आहे जाणून घेऊन घ्या

पुणे,दि.२२ डिसेंबर २०२३ : ख्रिसमस किंवा नाताळहा सण दरवर्षी २५ डिसेंबर या तारखेला जगभर साजरा केला जातो. या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून हा सण साजरा केला जातो.जगात जवळ जवळ सर्वत्र हा नाताळ सणाला महत्व दिले आहे. या दिवशी सगळीकडे ख्रिसमस ट्री (सूचिपर्णी झाड) विविध लाईट्स, बॉल व अजून बऱ्याच वस्तुंनी सजवले जातात,सँटा क्लॉजचे डेकोरेशन केले जाते तसेच एकमेकांना गिफ्ट दिले जातात. या दिवशी लाल किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे घातले जातात. एकमेकांना स्वीट देत ‘मेरी ख्रिसमस’ म्हणून शुभेच्छा दिल्या जातात.
‘ख्रिसमस’चा इतिहास काय आहे जाणून घेऊया
इ.सण ८०० ला चार्ल मेगन राजाचा राज्यभिषेक झाला. या दिवसापासून ख्रिसमस सण साजरारे करण्याचे महत्व वाढले आहे तसेच मध्य युगाच्या काळात या दिवशी सुट्टीला महत्व देण्यात आले. नाताळ हा शब्द लॅटिन भाषेपासून तयार झालेला आहे. नाताळचा अर्थ जन्म असा होतो आणि इंग्रजी मध्ये त्याला ख्रिसमस असे म्हणतात. जर्मनी मध्ये एक आजारी मुलाला संतुष्ट करण्यासाठी त्याला सदाहरित झाड छान तयार करून त्याच्या वडिलांनी त्याला भेट दिली होती असेही म्हंटले जाते. त्यामुळे आजूबाजूचे वातावरण शुभ राहण्यासाठी ख्रिसमस ट्री सजवली जाते.
सांताक्लॉजचे महत्व जाणून घ्या
ख्रिसमसच्या दिवशी सांताक्लॉजला खप महत्व आहे. सांताक्लॉज हि एक काल्पनिक व्यक्तिरेखा आहे. काही लोक सांताक्लॉजला येशू ख्रिस्ताचा पिता मानतात. पाश्चिमात्य संस्कृतीत असे मानले जाते कि सांता लहान मुलांना चांगले वागल्यावर नाताळच्या आधल्या दिवशी भेटवस्तू देऊन जातो. ख्रिसमस साजरा करत असताना काल्पनिक व्यक्ती लाल रंगाचे कपडे घालून घंटा वाजवत मुलांसाठी गिफ्ट व चॉकलेट्स, कपकेक, विविध प्रकारचे बिस्कीट अशा प्रकारचे खाद्य पदार्थ देऊन या सणाची शोभा वाढवतात.