
ख्रिसमसच्या दिवशी ‘लाल’ कपड्यांना का प्राधान्य दिले जाते, जाणून घ्या या मागचे कारण

पुणे,दि.24 डिसेंबर 2023 : ख्रिसमस म्हटलं कि आपल्या डोळ्यासमोर लाल रंगाचे कपडे घातलेला सांता दिसतो ज्याची दाढी पांढरी आहे व खांद्यावर एक गिफ्ट ची पिशवी आणि झिंगल बेल्सच गाणं. लहान मूल सुद्धा सुद्धा या दिवशी लाल रंगाचे कपडे,टोपी घातलेले दिसतात. अशामध्ये काही लोकांना प्रश्न पडतो कि ख्रिसमसला लाल रंगाचेच कपडे का घालतात? चला तर मग जाणून घेऊया ख्रिसमस आणि लाल रंगाचं काय नातं आहे.
लाल रंगाला प्रेमाचे प्रतिक मानले जाते. लाल रंग म्हणजे येशू ख्रिस्ताच्या रक्ताचेही प्रतिक मानलं जाते, प्रभु येशूने प्रत्येक ख्रिशनाना आपलं मुलं मानले म्हणून ख्रिसमसच्या दिवशी लाल कपडे घातले जातात.
ख्रिसमसला लाल कपडे घालण्यामागचे अजून एक कारण म्हणजे कोका कोला कंपनीची मार्केटिंग असे म्हंटले जाते.1930 मध्ये आर्की या विज्ञापन संस्थेने एका सामान्य माणसाला सांता चे लाल कपडे घालुन कोका कोला ची जाहिरात दाखवली होती. तेव्हापासून ख्रिसमसच्या दिवशी लाल कपडे घालायला सुरुवात झाली असे म्हणतात.