केरळमध्ये कोरोनाच्या नवीन व्हॅरियंटची ऐंट्री, एक जणाचा मृत्यू.

पुणे,दि.17 डिसेंबर,2023 : भारतात कोरोनाच्या नवीन व्हॅरियंटची ऐंट्री झाली असून यामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवरती आहे.

2019 पासून ‘कोरोना’ या महामारीने संपूर्ण जगाची झोप उडवली असताना आता कुठे याची भीती कमी झाली होती परंतु, कोविडचा नवा व्हॅरियंटची भारतात परत एण्ट्री झाल्यामुळं सगळीकडे चिंतेचे वातावरण पसरलेलं आहे. या नवीन सब – व्हॅरियंटच नाव JN.1आहे.

नवीन व्हॅरियंटमुळे एकाचा मृत्यू

कोरोनाच्या नवीन व्हॅरियंटमुळे केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील पनूर मध्ये एका 80 वर्षाच्या वृद्धाचा मृत्यू झाला आहे. या व्यक्तीला खोकला, सर्दी व श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यानंतर काही दिवसात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळं परिसरातील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. मास्क ची सक्ती व कोविड प्रतिबंधात्मक उपाय योजण्यात आले आहेत.

केरळमधील या घटनेनंतर आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी ऑक्सिजन सिलेंडर,मास्क,मेडिसिन व कोरोना रुग्णाला लागणाऱ्या सर्व गोष्टी वेळेवर उपलब्ध व्हाव्यात तसेच रुग्णाची कुठलीही गैरसोय होता काम नये असे निर्देश त्यांनी दिले. तसेच अशा कोविडच्या पार्श्वभूमीवर कोविडशी लढण्यासाठी ऑक्सिजन,मास्क चा तुडवडा होणार नाही, आम्ही या सर्व गोष्टींची तयारी केली आहे अशी माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे.

Leave a Comment