राज्यातील शाळांत आता ‘या’ विषयाचा असणार समावेश, शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती.
पुणे,दि.25 डिसेंबर 2023 : भारत हा कृषिप्रधान देश असुन येथील मुख्य व्यवसाय शेती आहे. त्यामुळे राज्यातील मुलांना सुरुवातीपासूनच शेतीचे ज्ञान व्हायला पाहिजे म्हणून राज्यात पहिलीपासून ‘कृषी’ हा विषय शिकवला जाणार आहे अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.
भारतात प्रामुख्याने ‘शेती’ हा व्यवसाय केला जातो. भारताची अर्थव्यवस्था हि शेती क्षेत्राशी निगडित आहे. सध्या राष्ट्रीय शिक्षणात कृषी शिक्षणाचा सहभाग 0.93 टक्के आहे.शेती विषयाचा अभ्यासक्रमात समावेश केल्यामुळे मुलांना शेतीविषयी शिकण्याची आवड लागेल. त्यामुळे मुलांना शेतीविषयी माहिती असणे आवश्यक आहे, मुलांना शेतीचे ज्ञान असल्यास ते व्यावहारिक शेती करू शकतात, येणारी नवीन पिढी शास्त्रीय पद्धतीनं शेती करू शकते. त्यामुळे राज्यातील शालेय अभ्यासक्रमात ‘कृषी’ हा विषय पहिलीपासून शिकविला जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.