पुणे,दि.18 डिसेंबर 2023 : यंदा आज सोमवार दि.18 डिसेंबर रोजी चंपाषष्टी आहे. या दिवशी खंडोबाला नैवद्य अर्पण करून तळी भरण करतात.श्री खंडोबा महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. मार्गशीष शूष्ठ षष्टीला चंपाषष्ठि म्हणतात.
हा सण कर्नाटक आणि महाराष्ट्रात खूप उत्साहाने साजरा केला जातो. आजच्या दिवशी खंडोबाची पुजा केली जाते. खंडोबा म्हणजे भगवान शंकराचा अवतार.
या दिवशी पूजेत भंडारा (हळदीचे पावडर) खूप म्हणत्वाचा असतो. खंडोबाला भंडारा उधळून नमस्कार केला जातो. महाराष्ट्रातील ‘जेजुरी’ हे खंडोबाचे देवस्थान आहे. तिथे संपूर्ण मंदिरात भंडारा उधळला जातो. भांडारामुळं जेजुरी चे मंदिर नेहमी पिवळे असते त्यामुळे जेजुरी ला ‘सोन्याची जेजुरी’ असेही म्हणतात.
खंडोबा कुलदैवत असणाऱ्या भाविकांसाठी लग्न समारंभात खंडोबाचं महत्वाचं स्थान असते. लग्नाच्या आधी रात्रभर जागर करून, भजन म्हणुन खंडोबाची आराधना केली जाते. व नवीन लग्न झालेले वर – वधु खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी जेजुरी ला जातात.
खंडोबाची तळीभरण कशी करतात
तळी भरणे म्हणजे एका ताम्हणात विड्याचे पान, सुपारी, भंडारा, खंडोबाचे टाक, पैसा, दिवे व खोबरे हे सगळे घरातलं 5 पुरुष ताम्हण उचलत ‘सदानंदाचा येळकोट येळकोट’ असे भंडारा टाकत 3 वेळा खाली वरती उचलतात व त्यानंतर एकमेकांना भंडारा लावून प्रसाद देतात. या दिवशी खंडोबाला भाकरी, वांग्याचे भरीत, पातीचा कांदा व कणकेचा रोगडा या पदार्थांचा नैवद्य दाखवतात.
खंडोबाची ऐकून बारा स्थाने
जेजुरी
निंबगाव
नळदुर्ग
पाली पेम्बर
शेंगुड
सातारा
माळेगाव
मंगसुळी
मैलापुर
मैलारलिंग
देवरगुड
कर्नाटक आणि महाराष्ट्र
हे वाचा
खंडोबाची विविध नावे
खंडोबा, मल्हारी, खंडेराय, मार्तंडभैरव, म्हाळसाकांत, रवळनाथ व येळकोटी. येळकोटी म्हणजे सात कोटी सैन्य असलेला.