PMC पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून दोन नवीन मार्गांची सुरुवात

Pune : पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून आजपासून (शुक्रवार) शहरातील दोन नवीन मार्गांची सुरुवात करण्यात आली आहे. हडपसर रेल्वे स्टेशनवरून शहरात येणाऱ्या व शहरातून हडपसर रेल्वे स्टेशनला जाणाऱ्या प्रवासी यांच्यासाठी बस सेवा सुरु करण्यात आली आहे. या मार्गावरील बसेस हडपसर रेल्वे स्टेशन ते शिवाजीनगर, स्वारगेट, निगडी, शिवाजीनगर, हडपसर रेल्वे स्टेशन असा प्रवास करतील.

त्याचबरोबर प्रवाशांच्या वाढत्या मागणीनुसार हडपसर गाडीतळ ते हडपसर रेल्वे स्टेशन (मार्गे – मगरपट्टा, मुंढवागाव, मुंढवा चौक, लोणकर कॉलनी) पर्यंत काही खेपा देण्यात येणार आहेत. या मार्गावरील बसेस हडपसर गाडीतळ ते हडपसर रेल्वे स्टेशन (मार्गे – मगरपट्टा, मुंढवागाव, मुंढवा चौक, लोणकर कॉलनी) असा प्रवास करतील.

या नवीन मार्गांमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या मार्गांवरील बसेसचे वेळापत्रक महामंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Leave a Comment