Breaking
24 Dec 2024, Tue

महामानवाचा ‘महापरिनिर्वाण’ दिन

महामानवाचा ‘महापरिनिर्वाण’ दिन' 
महामानवाचा ‘महापरिनिर्वाण’ दिन’

Mahaparinirvana day :  महामानवाचा ‘महापरिनिर्वाण’ दिन’ 

भारताचे शिल्पकार डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन म्हणजेच महापरिनिर्वाण दिन ६ डिसेंबर रोजी असतो . या दिवशी डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी शेवटचा श्वास घेतला . बौद्ध धर्मानुसार निर्वाण म्हणजे मोक्ष ,स्वातंत्र्य . जी व्यक्ती सांसारिक मोह आणि जीवनातून मुक्त होते तिला निर्वाण म्हणजेच मोक्ष मिळतो असे मानले जाते आणि म्हणूनच आंबेडकर यांच्या स्मृतिदिनाला महापरिनिर्वाण दिन म्हंटले जाते .

६ डिसेंबर १९५६ पासुन त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी लाखों लोक त्यांची अंतसंस्कार भूमि मुंबई येथिल चैत्यभूमि येथे गर्दी करतात .भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या ज्ञानाच्या प्रकाशाने कित्येक दिशाहीन लोकांना योग्य मार्ग दाखवला . बदल हा गरजेचं असतो आणि तो घडवायचा असेल तर सुरुवात स्वतःपासून करा असा संदेश त्यांनी दिला. शिक्षण हा सर्वांचा मूलभूत हक्क आहे , त्याला कुठल्याही जातीचे बंधन नाही . त्यामुळे शिका ,संघटित व्हा आणि संघर्ष करा अशी प्रेरणा त्यांनी दिली .डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अर्थशास्त्र या विषयात कोलंबिया विद्यापीठातून पीएच.डी.पदव्या मिळवल्या . आंबेडकर यांचा सामाजिक कार्यांत मोलाचे योगदान आहे .दलितांविरुद्ध होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला . स्वातंत्र्याच्या सावलीत असूनही जातीपातीच्या उन्हात चटके खाणाऱ्या दलितांसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर एक भव्य वृक्ष बनले म्हणूनच त्यांना दलितांचा कैवारी म्हंटले जाते . अशा महामानवाला ‘ महापरिनिर्वाण ‘ दिनानिनिमित्त कोटी कोटी नमन .

महापरिनिर्वाण’ दिन कविता 

‘भीमा तुझ्या शिक्षणाच्या तलवारीची धाराच न्यारी ,
भेदूनि टाकिली अहंकाराची डोकी सारी .
तुझ्या शाहीत सामावले सारे आकाश ,
मनोमनी गिरवला तू विद्येचा ध्यास .

तू सूर्य तू पेटती प्रचंड ज्वाला ,
तुझ्या ज्ञानाच्या प्रकाशाने मिळे दिनदुबळ्यांना उजाळा .

रात्रंदिवस दिव्याच्या प्रकाशात जेव्हा कष्ट करी ,
तेव्हा बत्तीस पदव्यांचा तूच मानकरी .

बौद्ध चळवळीची तूच प्रेरणा ,
तुझ्यात सामर्थ्य भेदभाव नष्ट करण्याचं .
अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचं ,
अन हक्कानं हक्क मागण्याच .

लाज नसावी दारिद्र्याची ,लाज असावी दुर्गुणांची ,
वेळोवेळी तुझ्या लेकरांना हीच असे शिकवण तुझी .

संविधानाचा तूच पाया,
तूच भारताचा शिल्पकार .
दाही दिशांत घुमत राहो
तुझाच जयजयकार
तुझाच जयजयकार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *