आपल्या प्रियजनांना नवीन वर्षाच्या ‘या’ शुभेछया द्या आणि नात्यांतील प्रेम अजुन वाढवा

पुणे,दि.28 डिसेंबर 2023 : 2024 म्हणजे नवीन वर्षाच्या आगमनाला काही दिवसच बाकी आहेत. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सगळे आतुरतनेने वाट बघत आहेत. या वेळी बरेच जण बाहेर फिरायला जातात किंवा 31नाईट च्या पार्टीची तयारी करताना दिसतात. हे सगळे चालु असले तरी नवीन वर्षाच्या शुभेच्छा ह्या नववर्षाच्या आगमनानंतर म्हणजेच 31 तारखेच्या रात्रीच्या 12 वाजल्यापासून देणं चालु होतात.जे आपले मित्र परिवास जवळ आहेत त्यांना स्वतःहून आपण मिठी मारून शुभेच्छा देतो परंतु जे दूर किंवा बाहेरगावी आहेत त्यांना फोन करून आणि मेसेजेस करून शुभेच्छा देतो. चला तर मग आपल्या प्रियजनांना ‘हैप्पी न्यू इयर’ म्हंटल्यावर ‘सेम टू यु’ म्हणणे सोडून या नवीन शुभेच्छा पाठवा व तुमच्या नात्यातील प्रेम अजून वाढवा.

नव्या वर्षाची नवी पहाट
नव्या किरणांसोबत नवी आस
या आशेसोबत पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा,
नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.

उंच उंच यशाची शिखरे गगनाला भिडू दे,
स्वप्नांच्या रंगांनी चारही दिशा उजळू दे,
या नवीन वर्षात सार काही तुमच्या मनासारखे घडू दे.नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.


सरत्या गोष्टींना जाऊ देऊया,

नव्या कल्पनांचे नवीन स्वप्न रचुया.
नव्या वर्षात नव्याने येणाऱ्या दिवसांचे, दोन्ही हातांनी हसत स्वागत करूया.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

तुमच्या मैत्रीची साथ अशीच आमच्यासोबत राहू दे
आपल्यातील ऋणानुबंधाचे नाते असेच अतूट राहू दे

तुमच्या सत्कार्याला नेहमी
फुटो यशाची पालवी
दुःखाचे डोंगर हटून
सुख नांदो तुमच्या दारी

Leave a Comment