Uncategorized

‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त जाणून घ्या मराठी भाषेची निर्मिती व इतिहास

पुणे, दि.27 फेब्रुवारी,2024 : आज म्हणजे ’27 फेब्रुवारी’ हा दिवस सम्पूर्ण जगभरात ‘मराठी दिन’ म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषा दिनाला खूप महत्व आहे. प्रसिद्ध कवी विष्णू वामन शिरवाकर म्हणजे आपले ‘कुसुमाग्रज’ यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. कित्येक कवी, लेखक व दिग्गजानी मराठी भाषेत आपले विचार व्यक्त करत मराठी भाषेला न्याय दिला आहे. मराठी भाषेला अमृताची उपमा दिली आहे.


महाराष्ट्रात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा म्हणजे मराठी. मराठी भाषेतील गोडवा कुसुमाग्रज्यांच्या कवितेतून अनुभवायला मिळतो.

*मराठी भाषेचा इतिहास व निर्मिती*

‘मराठी’या शब्दात खूप ताकत आहे. मराठी भाषेचा इतिहास खूप जुना आहे. विविध परंपराने नटलेला देश म्हणजे भारत. वेगवेगळ्या जातीधर्माचे लोक भारतात राहतात. सर्व धर्माचे लोक मिळून 800 भाषा बोलतात. देशातील 7.1 टक्के लोक मराठी भाषा बोलतात. हिंदी व बंगाली नंतर तिसऱ्या नंबरवर बोलली जाणारी भाषा म्हणजे मराठी. संस्कृतचे काळाच्या ओघात विशिष्ट दिशेने परिवर्तीत झालेले रूप म्हणजेच मराठी भाषा. मूळ संस्कृत भाषा वायव्य भारतातून पूर्वेकडे व खाली दक्षिणेकडे पसरत गेली. मराठी भाषा हि ज्ञानभाषा आहे. मराठीने तिच्यातून शेकडो वाक्यप्रयोग, शब्द तसेच स्वरही उचलले आहेत. त्यामुळे मराठी भाषेला एक विशिष्ट स्थान आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *