मासिक पाळी अपंगत्व नाही,त्यामुळे ‘पेड लिव्हची’ गरज नाही:स्मृती इराणी.

पुणे,दि.15डिसेंबर 2023: मासिक पाळी काही अपंगत्व नाही त्यामुळे पेड लिव्हची गरज नाही,असे वक्तव्य केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी केले आहे.

महिला कर्मचाऱ्यांना मासिक पालीच्या काळादरम्यान मिळणाऱ्या पेड लिव्हला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी विरोध दर्शविला आहे.राज्यसभेत खासदार मनोजकुमार झा यांनी राज्यसभेत देशातील मासिक पाळी स्वच्छता धोरणावर विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देत त्या म्हणाल्या, ‘मासिक पाळी हा स्त्रियांच्या जीवनाचा नैसर्गिक भाग आहे, मासिक पाळी अपंगत्व नाही,त्यामुळे असे मुद्दे उपस्थित करून आपण त्यांना हक्काच्या समान संधींपासून वंचित राहावे लागेल.महिलांना सुट्टी दिली तर भेदभाव होऊ शकतो.त्यामुळे मासिक पाळी दरम्यान पगारी सुट्टीची हमी देऊ शकत नाही असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.एक महिला असून अशा व्यक्तव्यामुळे अनेकांनी आश्चर्य व नाराजगी व्यक्त केली आहे.

Scroll to Top