पुणे जिल्ह्यातील वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. याबाबत पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र देशमुख यांनी माहिती दिली आहे. देशमुख यांनी सांगितल्याप्रमाणे, संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात वाहतुकीत बदल करण्याचा निर्णय झाला आहे.
Aurangzeb : कर्जत तालुक्यातील मिरजगाव औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्याप्रकरणी बंदचा निर्णय !
14 जून ते 18 जून दरम्यान संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी वाहतुकीत बदल राहणार आहे. हा पालखी सोहळा पुणे सासवड लोणंद मार्गे पंढरपूर कडे जाणार आहे. तसेच संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी 15 जून ते 24 जून दरम्यान वाहतुकीत बदल राहणार आहे. हा पालखी सोहळा पुणे ते सोलापूर मार्गे रोटी घाट मार्गे बारामती इंदापूर अकलूज मार्गे पंढरपूरला जाणार आहे.
1 जून ते 15 ऑगस्टपर्यंत 75 हजार पदांची मेगा भरती; Government Jobs करू इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी
14 जून च्या रात्री दोन वाजेपासून ते 16 जूनच्या रात्री बारा वाजेपर्यंत पुणे ते सासवडकडे दिवेघाट व बोपदेव घाट मार्गे जाणारी वाहतूक बंद करण्यात आले आहे. या कालावधीत पुणे ते सासवड दरम्यान प्रवास करण्यासाठी प्रवाशांना खडीमशीन चौक-कात्रज-कापूरहोळ मार्गे वळवण्यात येणार आहे. तसेच सासवड ते पुणे दरम्यान प्रवास करण्यासाठी प्रवाशांना गराडे खेड शिवापुर मार्गे जाता येणार आहे.