माजी खासदार संभाजीराजे यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या मतदार संघातील विकासकामांची झडती घेतली आहे. संभाजीराजे राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या मतदार संघातील ग्रामीण आरोग्यकेंद्राची पाहणी केली. यावेळी तेथील अवस्था पाहून संभाजीराजेंनी संतापव्यक्त केला आहे. त्यांनी थेट तानाजी सावंत यांच्या राजानाम्याची मागणी केली आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत स्वत:च्या मतदारसंघातील ग्रामीण आरोग्यकेंद्राची सुव्यवस्था ठेवू शकत नाहीत. त्यांचा भोंगळ कारभार मी स्वतः उघडकीस आणून एक महिना झाला तरीदेखील परिस्थिती “जैसे थे” आहे ! इतके हे मंत्री महोदय निर्ढावलेले आहेत. pic.twitter.com/aJCElQyW7u
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) March 28, 2023