
वर्षातील शेवटच्या ‘संकष्टी’च्या दिवशी अशा प्रकारे करा गणपतीची आराधना, प्रत्येक मनोकामना होतील पूर्ण

पुणे,दि.डिसेंबर,2023 : आज दि.30 डिसेंबर रोजी 2023 मधील शेवटची संकष्टी चर्तुर्थी आहे. या दिवशी उपवास करून गणपतीची आराधना केली जाते.सर्व देवदेवतांमध्ये गणपतीला श्रेष्ठ देव मानतात. विघ्नहर्ता म्हणून प्रत्येक शुभकार्य करायच्या अगोदर गणपतीची पूजा केली जाते. तर आज वर्षातील शेवटच्या संकष्ट चतुर्थीला गणपतीची अशा प्रकारे पूजा करा.
डिसेंबर 2023 हि मार्गशीष महिन्यात येणारी व 2023 मधील शेवटची चतुर्थी आहे.या दिवशी गणपतीची पूजा केल्याने सर्व विघ्न दूर होऊन मनातील मनोकामना पूर्ण होतात असे शास्त्रात सांगितलं आहे.
चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाच्या वेळी विड्याच्या पानावर गणपतीरूपी सुपारीची स्थापना करावी. लाल फुल,दुर्वा व गुलाल गणपतीला अर्पण करावा. कापसाचे वस्त्र माळ घालावी उकडीच्या किंवा साध्या मोदकांचा नैवद्य दाखवावा.
चतुर्थीच्या दिवशी मंदिरात बरेचजण लाडचा प्रसाद देवाला अर्पण करतात. अशा वेळी देवाचा प्रसाद लहान गरीब मुलांना द्यावा.अन्न वाया न घालवता ते इतरांना दान करावे.
संकष्टीच्या दिवशी ‘ओम श्री हीं क्लिंम ग्लो गं गणपतये वर वरद सार्वजनम मे वषमनाय स्वाहा’ या मंत्राचा 108 वेळा जप करावा.त्यामुळे बाप्पा प्रसन्न होईल व तुमच्यावर सदैव त्यांचा आशिर्वाद राहील.
असे म्हणतात आजच्या दिवशी गणपतीची पूजा,आराधना केल्यानं सर्व इच्छा पूर्ण होतात व घरात समृद्धी राहते.
टिप : वरील सर्व माहिती फक्त माहिती म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोचवत आहेत.याचा कुठलाही दावा करत नाहीत.