पुणे, दि,२० डिसेंबर २०२३ : माणसात देव शोधणारा संत म्हणजे गाडगे महाराज म्हणजेच गाडगे बाबा. गाडगे बाबा हे महाराष्ट्रातील एक संत, समाजसुदारक व कीर्तनकार होते. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते तर आईचे नाव सखुबाई होते.गागडे बाबांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी महाराष्ट्रातील शेणगाव येते झाला होता तर आज २० डिसेंबर १९५६ रोजी त्यांनी अमरावती येथे अखेरचा श्वास घेतला.आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या जीवनकार्याचा प्रवास जाणून घेऊया.
गाडगे बाबा हे प्रवाशी सामाजिक शिक्षक होते. पायात फाटकी चप्पल व हातात नेहमी फूटक गाडगं असायचे म्हणून त्यांचं नाव गाडगे बाबा असे पडले. गाडगे बाबा नेहमी कुठेही प्रवास कराताना हातात नेहमी झाडू ठेवायचे आणि ज्या गावी जातील तो संपूर्ण गाव झाडून काढायचे. सार्वजनिक स्वच्छता व अंधश्रद्दा निर्मूलन हि तत्वे सर्वत्र रुजविण्यासाठी त्यांनी जीवापाड प्रयत्न केले. आपल्या परिसरातील स्वच्छता किती महत्वाची आहे, परिसर स्वच्छ असेल तरच आपण निरोगी राहून स्वतःची प्रगती करू शकू आणि आपण प्रगतिशील झालो तरच इतरांना प्रगतीच्या मार्गाकडे घेऊन जाऊ शकतो, असे विचार त्यांनी आपल्या गाण्यांतून कीर्तनातून मांडले.
माणसाला माणसाप्रमाणे वागवा,सत्याचा मार्ग अवलंबा,जातीभेद पळू नका, कोणी जर तुम्हाला विचारले तुमची जाड कोणती आहे तर त्यांना मी ‘माणूस’ आहे असे सांगा. देव हा दगडात नसून माणसांत आहे हि शिकवण वेळोवेळी त्यांनी सर्वसामान्यांना दिली. असे महान कार्य करणाऱ्या सत्यशोधक गाडगेबाबांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.