सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठचा परीक्षा विभाग , भ्रष्टाचाराचा अड्डा!

पुणे, २६ ऑगस्ट २०२३ – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा परीक्षा विभाग भ्रष्टाचाराचा अड्डा बनला आहे. विद्यापीठातील एका कर्मचाऱ्याला मार्क शीट देण्यासाठी लाच घेताना आज अभाविपच्या कार्यकर्त्यांनी रंगे हात पकडले.

अभाविपच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यापीठातील परीक्षा विभागातील एका कर्मचाऱ्याने एका विद्यार्थ्याला मार्क शीट देण्यासाठी ५००० रुपयांची लाच मागितली. विद्यार्थ्यांनी याबाबत अभाविपच्या कार्यकर्त्यांना कळवले. कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्याच्या सोबत जाऊन कर्मचाऱ्याला लाच घेताना रंगे हात पकडले.

Scroll to Top