Pune News : Stay up-to-date with the latest pune news and local news from Pimpri Chinchwad with Pune City Live . Explore latest updates from Politics news, entertainment to crime news.

Pimpri Chinchwad : थेरगांव मध्ये वाहतूक व्यवस्थेत बदल !

Pimpri Chinchwad News
Pimpri Chinchwad News

Pimpri Chinchwad News : वाहतुक नियंत्रण अधिसूचना

लोकसभा सार्वत्रीक निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने वाकड वाहतूक विभाग (Wakad Transport Department) हद्दीतील पिंपरी चिंचवड मनपा कामगार भवन थेरगांव येथे दि.१२/०५/२०२४ रोजी ३३ मावळ लोकसभा मतदार संघ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदार संघाचे मतपेटी वाटप होणार असुन सदर ठिकाणाहुन कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रापर्यंत नेणे व परत आणणेकरता एकुण १३८ लहान मोठ्या वाहनांची व्यवस्था केलेली आहे. त्याकरीता तापकीर चौकाकडून थेरगांवकडे येणाऱ्या वाहतूकीमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे.

Pimpri Chinchwad :पिंपरी चिंचवडमधील लाँड्री चालकाने लाखोंचा ऐवज केला परत !

ज्याअर्थी पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुक सुरक्षित व सुरळीतपणे होणेकरीता, महाराष्ट्र शासन गृह विभाग क्र. एम. व्ही. ए. ०१९६/८७१/सी आर ३७/टी आर ए २, दिनांक २७/०९/१९९६ चे नोटीफिकेशन नुसार मोटार वाहन कायदा कलम ११५, ११६(१) (ए) (बी), ११६(४) आणि ११७ अन्वये मला अधिकार प्राप्त झाला आहे त्याअर्थी मी विशाल गायकवाड, पोलीस उप-आयुक्त, वाहतुक शाखा, पिपंरी चिंचवड शहर, यापुर्वी काही निर्बंध असतील ते रद्द करण्यात येत असुन खालील प्रमाणे तात्पुरते स्वरुपात आदेश निर्गमित करण्यात येत आहेत.Pimpri Chinchwad News

वाकड वाहतुक विभाग अंतर्गत
१) तापकीर चौक येथुन थेरगांवकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे. पर्यायी मार्गः सदर मार्गावरील वाहने काळेवाडी रोडने काळेवाडी फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.

खुशखबर : पीएमपीएमएल च्या कर्मचाऱ्यांना जुलै पासून सातवा वेतन आयोग लागू …

) थेरगांव पोलीस चौकी येथुन तापकीर चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी. २
पर्यायी मार्गः सदर मार्गावरील वाहने थेरगांव पोलीस चौकी येथुन उजवीकडे वळुन पाण्याची टाकी मार्गे इच्छित स्थळी जातील.
३) माध्यमीक विद्यालय थेरगांव समोरील चौकातून तापकीर चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांस बंदी. पर्यायी मार्गः सदर मार्गावरील वाहने माध्यमीक विद्यालय थेरगांव समोरील चौकातून उजवीकडे वळुन ग प्रभागच्या रोडने इच्छित स्थळी जातील.
तरी वरील प्रमाणे दि.१२/०५/२०२४ रोजी पहाटे ०५:०० ते दि.१३/०५/२०२४ रोजी ००:०० वा. पर्यंत अथवा मतपेट्या जमा होईपर्यत (अत्यावश्यक सेवेतील तसेच निवडणुक प्रक्रियेत समाविष्ठ असलेली वाहने वगळून) आवश्यकतेनुसार वाहतुक पर्यायी मार्गाने वळविण्यात येत असुन अधिसुचना (नोटीफिकेशन) काढण्यात येत आहे.
तरी नागरीकांनी नमुद कालावधीत दिलेल्या पर्यायी मार्गाचा वापर करावाPimpri Chinchwad News

Join Buttons Join WhatsApp Group Join Telegram Channel