letest News & updets in Pune

राजकीय फायद्यासाठी शेतकऱ्यांची दिशाभूल – रोहीत पवार

दोन दिवसांपूर्वी गुजरातच्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठवण्याचा निर्णय घेतल्याने महाराष्ट्रात संतापाची प्रचंड लाट उसळली,

परिणामी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या रोषाचा फटका निवडणुकीत बसू नये म्हणून ९९१५० मेट्रिक टन कांदा निर्यातीस परवानगी देण्याच्या खोट्या बातम्या जाणीवपूर्वक पेरण्यात आल्या. राजकीय फायद्यासाठी शेतकऱ्यांची दिशाभूल करणं केंद्र सरकारला शोभत नाही.

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे जवळपास ५ हजार कोटीहून अधिकचं नुकसान झालं. हे राज्यातले शेतकरी कदापि विसरणार नाहीत. –  रोहीत पवार यांनी असे त्यांच्या ट्विटर वरून बोलले आहेत .

Join Buttons Join WhatsApp Group Join Telegram Channel
Leave A Reply

Your email address will not be published.