katraj : जिवाची पर्वा न करता धोकादायक रिल्स बनवणाऱ्या तरुण-तरुणीवर गुन्हा दाखल !

0
katraj : जिवाची पर्वा न करता धोकादायक रिल्स बनवणाऱ्या तरुण-तरुणीवर गुन्हा दाखल !

katraj : जिवाची पर्वा न करता धोकादायक रिल्स बनवणाऱ्या तरुण-तरुणीवर गुन्हा दाखल !Pune News : दिनांक २० जून २०२४ रोजी नवीन कात्रज हायवेवरील स्वामी नारायण मंदिरा(Swami Narayan Mandir) जवळील पडक्या उंच इमारतीवरुन एक तरुण व एक तरुणी यांनी जिवाची पर्वा न करता एक धोकादायक व्हीडिओ तयार करून त्याची रिल्स बनविली. ही रिल्स सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.

भारती विद्यापीठ पोलिसांनी व्हीडिओची खात्री करून अनोळखी तरुण व तरुणी यांच्यावर स्वतःचे व इतरांचे जीव धोक्यात आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनने गुन्हा रजि नंबर ५१५/२०२४, भादंवि कलम ३३६, ३४ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. सदर तरुण व तरुणीचा शोध चालू आहे आणि त्यांचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई केली जात आहे.

ही कारवाई मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, पुणे शहर श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे श्रीमती नंदिनी वग्याणी यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. डी.एस. पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री शरद झिने व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *