Pune : मतदान करण्यासाठी मतदार ओळखपत्र नसल्यास,या १२ ओळखपत्रांचा वापर करता येणार !
मतदानासाठी मान्य असलेले ओळखपत्रे:
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- दिव्यांग व्यक्ती ओळखपत्र
- कामगार आरोग्य विमा स्मार्ट कार्ड
- वाहन चालक परवाना
- पासपोर्ट
- निवृत्तिवेतन दस्तऐवज
- मनरेगा रोजगार ओळखपत्र
- शासकीय/सार्वजनिक उपक्रम/पब्लिक लिमिटेड कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचे सेवा ओळखपत्र
- बँक किंवा टपाल विभागाचे पासबुक (छायाचित्रासह)
- राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही स्मार्ट कार्ड
- संसद/विधानसभा/विधानपरिषद सदस्यांचे ओळखपत्र
या सर्व ओळखपत्रांपैकी कोणतेही एक दस्तऐवज मतदानाच्या वेळी मतदारासोबत बाळगणे अनिवार्य आहे. भारत निवडणूक आयोग याबाबत जनतेमध्ये जनजागृती करत असून, मतदारांनी मतदान केंद्रावर योग्य ओळखपत्रासह हजर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
यासंदर्भात अधिक माहिती हवी असल्यास मतदारांनी Voter Helpline App वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.