Hadapsar news : हडपसरमध्ये जबरी चोरी; ८० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास

Hadapsar news – शेवाळवाडी (Shewalwadi Pune news) परिसरात एका ४५ वर्षीय महिलेला लक्ष्य करत मोटारसायकलवरील दोन अनोळखी इसमांनी तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने(Hadapsar crime update ) हिसकावून नेल्याची घटना दि. ५ मे २०२५ रोजी रात्री ९.३० वाजता समृद्धी बंगला, महादेव मंदिराशेजारी घडली.

फिर्यादी महिला या पायी जात असताना दोन अनोळखी इसम दुचाकीवरून त्यांच्या जवळ आले आणि त्यांच्या गळ्यातील सुमारे ८०,००० रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जबरी चोरी करून पळून गेले.

या घटनेनंतर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस तपास सुरू आहे. अद्याप आरोपींची ओळख पटलेली नाही आणि अटकही झालेली नाही.

पोलिसांकडून अपील:
घटनेच्या वेळी या परिसरात कुणी काही पाहिले असल्यास किंवा कोणतीही माहिती असल्यास तात्काळ हडपसर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment