Pune : हे काय चाललंय पुण्यात? ज्या शहराला आपण विद्येचे माहेरघर आणि संस्कृतीचा वारसा म्हणतो, तिथे एका ६९ वर्षीय आजोबांसोबत जे घडलं ते ऐकून तुम्हाला लाज वाटेल आणि रागही येईल.
तुम्ही फक्त कल्पना करा…
दिल्लीवरून आलेले एक ६९ वर्षांचे आजोबा. शनिवार, दि. १२/०७/२०२५ रोजी सकाळी ९:२० वाजता पुणे स्टेशनवर उतरले. एका रिक्षात बसले. आणि तो रिक्षावाला त्यांना कुठे घेऊन गेला असेल? दोन-चार किलोमीटर? नाही!
तो नराधम त्या आजोबांना तब्बल ७ तास रिक्षात फिरवून थेट भीमाशंकरच्या घनदाट जंगलात घेऊन गेला!
तिथे, चाकुचा धाक दाखवून, जीवे मारण्याची धमकी देऊन त्या वयस्कर माणसाकडून Google Pay वरून ₹४,५०० आणि खिशातून ₹१५,००० रोख, असे एकूण ₹१९,५०० जबरदस्तीने काढून घेतले.
काही प्रश्न जे डोकं सुन्न करतात: १. पुणे स्टेशन ते भीमाशंकर… रिक्षाने? ७ तास? हे कसं शक्य आहे? २. एवढा वेळ ते आजोबा त्या रिक्षात काय करत होते? त्यांना मदत का मिळाली नाही? ३. फक्त १९,५०० रुपयांसाठी एवढा मोठा प्लॅन? की अजून काही हेतू होता? ४. पुण्यात आता रिक्षात बसणंसुद्धा सुरक्षित राहिलेलं नाही का?
या घटनेने फक्त लुटमार नाही झाली, तर पुण्याच्या आणि आपल्या माणुसकीच्या तोंडाला काळं फासलं गेलंय. हा रिक्षावाला कोण आहे? तो अजूनही शहरात खुलेआम फिरत असेल का?
या नराधमाला शोधायलाच हवं! हा विषय फक्त पोलिसांचा नाही, आपला सगळ्यांचा आहे. यावर कमेंट करा, हे शेअर करा. हा कोण असू शकतो, याबद्दल काही अंदाज असल्यास पोलिसांना कळवा.
तुमच्या एका शेअरने किंवा माहितीच्या एका कणानेही फरक पडू शकतो.