Fighter Movie Song : ‘फायटर’ मधील ‘शेर खुल गये’ गाण्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद, हृतिक – दीपिकाची जोडी ठरतेय सुपरहीट.

16 डिसेंबर,2023: ‘वॉर’ आणि ‘पठाण’ नंतर सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘फायटर ‘ हा सिनेमा 25 जानेवारी 2024 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे .या सिनेमातील ‘शेर खुल गये’ गाणं काल (15 डिसेंबर )रोजी प्रदर्शित झाले असुन चाहत्यांचा गाण्याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. तसेच हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांच्या केमिस्ट्रीनं फॅन्सचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘शेर खुल … Read more

रोहीत शर्माच्या कर्णधार पदाच्या ‘रिप्लेसमेंट’ मुळे मुंबई इंडियन्स फॅन्स कडून संताप व्यक्त.

16 डिसेंबर,2023: रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्स चे नाते मुंबई इंडियन्सचे फॅन्स 2013 पासून बघत आले आहेत.पण आता हार्दिक पांड्याला नवा कर्णधार बनवल्यापासून मुंबई इंडियन्सच्या फॅन्स मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातुन नाराजी बघायला मिळत आहे. गेल्या दहा वर्षात रोहित शर्मानं मुंबई इंडियन्सचे यशस्वी कर्णधार पद भूषविले आहे. रोहित शर्मानं त्याच्या नेतृत्वात 5 वेळा आयपीएल ट्रॉफी पटकवली … Read more

सेन्सेक्स पहिल्यांदाच 71 हजारांच्या पार,निफ्टीची देखील 21 हजार 300 पर्यंत मजल.

पुणे,दि.15 डिसेंबर,2023: शेअर बाजार ऑल टाइम हाय सेन्सेक्स 71 हजाराच्या पातळीवर पोचले असुन,निफ्टीची देखील 21 हजार 300 पर्यंत मजल पोचली आहे.या दोन्ही निर्देशकांनी नवा उच्चांकी स्थर गाठला आहे. भारतीय शेअर बाजाराने पुन्हा एकदा नवीन उच्चांकी स्थर गाठला आहे. मार्केटचे दोन्ही निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीने परत एकदा नवीन शिखर गाठले आहे. सध्या भारतीय बाजारात व्यवहाराचे तेजीचे … Read more

मासिक पाळी अपंगत्व नाही,त्यामुळे ‘पेड लिव्हची’ गरज नाही:स्मृती इराणी.

पुणे,दि.15डिसेंबर 2023: मासिक पाळी काही अपंगत्व नाही त्यामुळे पेड लिव्हची गरज नाही,असे वक्तव्य केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी केले आहे. महिला कर्मचाऱ्यांना मासिक पालीच्या काळादरम्यान मिळणाऱ्या पेड लिव्हला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी विरोध दर्शविला आहे.राज्यसभेत खासदार मनोजकुमार झा यांनी राज्यसभेत देशातील मासिक पाळी स्वच्छता धोरणावर विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देत त्या म्हणाल्या, … Read more

मार्गशीष महिन्यातील गुरुवारी ‘श्री महालक्ष्मी’चे व्रत का व कसे करतात, जाणून घ्या पूजा विधी साहित्य व कहाणी. 

मार्गशीष महिन्यातील गुरुवारी ‘श्री महालक्ष्मी’चे व्रत का व कसे करतात, जाणून घ्या पूजा विधी साहित्य व कहाणी. पुणे,दि.१४ डिसेंबर,२०२३: आज मार्गशीष महिन्यातील पहिला गुरुवार असून आजच्या दिवशी श्री महालक्ष्मीची आराधना केली जाते. या महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीची पूजा केल्याने घरात सुख,शांती व समृद्धी नांदते हे व्रत केल्याने तिचा आशीर्वाद नेहमी पाठीमागे राहतो.चारही गुरुवारी स्त्रिया उपवास … Read more

सीबीएससी कडुन दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेपासून परीक्षांना सुरुवात.

पुणे,दि.13 डिसेंबर2023: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (CBSE) दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.या परीक्षांचा कालावधी 15 फेब्रुवारी 2024 te 10 एप्रिल 2024 असणार आहे. परीक्षांचे वेळापत्रक मिळाल्याने विद्यार्थी आता अभ्यासाचे नियोजन करून परीक्षाची तयारी करू शकतात.वेळापत्रक मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. आतापासून योग्य नियोजन पद्धतीने अभ्यास केल्यास मुलांना परीक्षेत घवघवीत यश नक्कीच … Read more

जेष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन.

पुणे,दि.१३ डिसेंबर,२०२३: मराठी सिनेसृष्टीतील जेष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मराठी सृष्टीतील जुना नट हरवल्यामुळं सगळीकडे शोकाकुल पसरला आहे. रवींद्र बेर्डे हे मागील काही दिवसांपासून आजारी होते.माहितीनुसार,त्यांना घशाचा कर्करोक झाला होता. त्यांच्यावर टाटा रुग्णालयात उपचार सुरु होते. प्रकृती चांगली झाल्यावर त्यांना घरी पाठवण्यात आले पण काही दिवसांनी त्यांना … Read more

‘लोकनेता’ गोपीनाथ मुंढे यांच्या जयंतीनिमित्त जाणून घेऊया त्यांची राजकीय जीवनयात्रा.

पुणे, 12 डिसेंबर 2023: महाराष्ट्रातील जनतेच्या मनात अजूनही घर करून असलेला, गरिबांचा हक्काचा देवमाणुस, ज्याच्यात राजकीय तत्वज्ञानासोबतच आपुलकीची भावना असणारा नेता माननीय गोपीनाथ मुंढे यांची आज जयंती आहे.गोपीनाथ मुंढे म्हणजे महाराष्ट्रातील एक तडफदार नेतृत्व. त्यांची जीवनयात्रा म्हणजे संघर्ष यात्रा. आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनाबद्दल जाणुन घेऊया. व्यतिगत जीवन:गोपीनाथ मुंढे यांचा जन्म 12 डिसेंबर 1949 रोजी … Read more

हिवाळ्यात निरोगी राहायचे असेल तर अशा प्रकारे घ्या स्वतःची काळजी.

हिवाळा म्हटले कि सर्दी खोकला यासारख्या आजाराचे प्रमाण वाढते. काही जणांना तर छोट्या छोट्या आजारांपासून निमोनिया सारख्या आजारांचा सामना करावा लागतो. आरोग्याच्या या समस्या टाळण्यासाठी स्वतःची देखभाल करणे आवश्यक आहे. यासाठी खालील टिप्स नक्की जाणून घ्या. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये शारीरिक समस्या टाळण्यासाठी शरीराचे संतुलित तापमान ठेवावे लागते. तापमानात घट झाल्यानं सर्दी, खोकला यांसारखे आजार उद्धभवतात. तसेच … Read more

मालगाडी रुळावरून घसरल्याने कसारा घाटातील वाहतूक ठप्प.

नाशिक,दि.11डिसेंबर 2023: इगतपुरी ते कसारा घाट दरम्यान मुंबई रेल्वे मार्गाकडुन येणाऱ्या मालगाडीचे सात डब्बे रुळावरून घसरल्यामुळे वाहतूक कोंडी होऊन इतर प्रवाशी गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली आहे.हि घटना रविवारी रात्री सात च्या दरम्यान घडली आहे. कसारा ते इगतपुरीकडे येणाऱ्या मार्गावरून गाडी घसरल्याने घाटात मालगाडीचे सात डब्बे रुळाच्या खाली गेले. या घाटात तीन रेल्वे मार्ग आहेत.त्यामुळे मुंबईहून नाशिककडे … Read more