
पुणे: हिंगणे खुर्द, साई नगर येथील डोंगरमाथ्यावरील पाणी मोठ्या प्रमाणात येत असल्याने घरात पाणी शिरले आहे. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या परिस्थितीत नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी रवाना झाले आहे.
स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, डोंगरावरून आलेल्या पाण्यामुळे अनेक घरांत पाणी साचले आहे आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या परिसरातील परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.
Twitter Link videos