
📌 पुणे | ऑनलाईन फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. असाच एक प्रकार पुण्यात घडला असून, एका ४९ वर्षीय महिलेच्या बँक खात्यातून ८,६०,००० रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून तिची फसवणूक करण्यात आली आहे.()
काय घडले नेमके?
दि. १३ जानेवारी २०२५, रोजी फिर्यादी महिलेच्या मोबाईलवर अनोळखी व्यक्तीकडून कॉल आला. त्या व्यक्तीने केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने महिलेच्या बँक खात्याशी संबंधित माहिती घेतली. त्यानंतर आरोपीने फिर्यादीला बँकेच्या APK फाईलवर जाऊन डिटेल्स भरायला सांगितले.
फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी संबंधित फाईलमध्ये आपले डिटेल्स भरले, आणि त्यानंतर काही वेळातच त्यांच्या बँक खात्यातून ८.६० लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले.
पोलीस तपास सुरू!
ही बाब लक्षात येताच महिलेने अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम ३१८(४), ३१९(२) आणि आयटी अॅक्ट ६६(डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
🔍 सध्या पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात असून, संबंधित मोबाईल धारक अद्याप अटकेत नाही.
➡️ ऑनलाईन फसवणुकीपासून वाचण्यासाठी नागरिकांनी कोणत्याही अनोळखी लिंक, अॅप किंवा कॉलवर विश्वास ठेवू नये, तसेच बँक खाते माहिती कोणालाही शेअर करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.