---Advertisement---

मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय , स्पा सेंटरवर छापा टाकुन ०४ पिडीत मुलींची सुटका

On: December 9, 2022 5:29 PM
---Advertisement---

 

Pune City Live News : पुण्यातील स्पंदन स्पा  येथे मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालत असल्याने पोलिसांनी कारवाई करत तीन मुलींची सुटका केली आहे ,यायाबाबत  बाबत गोपनीय माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती  . या मसाज सेंटर मध्ये स्पा मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालु असल्याचे आढळुन आल्याने तात्काळ छापा कारवाई करून सदर ठिकाणावरून एकुण ०४ पिडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे.

हा स्पा बालेवाडी रोड, बाणेर, पुणे इथे असून  मालका विरूध्द चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन येथे गुरनं ५५२ / २०२२ भादवि ३७०, ३४ सह अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक अधिनियम कायदा कलम ३,४,५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन आरोपी स्पा मालक व पिडीत महिलांना पुढील कारवाई करीता चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Editorial Team

Pune City Live या वेबसाईटचे आपल्या वेबसाईटसाठी विविध क्षेत्रांतील बातम्या आणि लेख लिहितात. त्यांच्या लेखणीतून पुण्यातील विविध घडामोडी, घडामोडींची विश्लेषणे, तसेच इतर महत्त्वाच्या विषयांवरील माहिती वाचकांपर्यंत पोहोचवली जाते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment