COVID-19 : कोरोनामुळे भारताला धोखा ?, मोदींची आज भारतातील कोरोना बाबत आढावा बैठक

0

COVID-19: कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा भीती दाखवायला सुरुवात केली आहे. चीनपासून ते अमेरिकेपर्यंत कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे हाहाकार माजला आहे. दरम्यान, भारतातही केंद्र सरकार अलर्ट मोडवर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली आहे. याआधी बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनीही अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती.

 

भारताच्या शेजारील देश चीनमध्ये कोरोना व्हायरसने कहर केला आहे. परिस्थिती अशी आहे की दररोज हजारो लोक मरत आहेत. बुधवारी, आरोग्यमंत्र्यांनी एका ट्विटमध्ये सांगितले की, “कोविड अजून संपलेला नाही.” मी सर्व संबंधितांना सतर्क राहण्याच्या आणि पाळत ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. आम्ही कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहोत.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *