मित्राबद्दल बोलल्याचा राग; बावधन येथे बांधकाम व्यावसायिकाला बेल्टने मारहाण

0
image (2)

पुणे: बावधन येथे एका बांधकाम व्यावसायिकाला ‘मित्राबद्दल काय बोलला?’ याचा जाब विचारून बेल्टने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत फिर्यादीच्या कपाळाला दुखापत झाली आहे. बावधन पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.Pune News

नेमकं काय घडलं?

१३ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री १०:३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. अभिजीत दत्तात्रय ऐनपुरे (वय ३२, रा. कोथरूड) हे त्यांच्या साईलीला प्रॉपर्टीज ऑफिसमध्ये बसले असताना, आरोपी अतुल व्ही. केसवड (वय ३५) तिथे आला.

अतुलने अभिजीत यांना त्यांच्या मित्राबद्दल काहीतरी बोलल्याचा जाब विचारला. यावरून त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर, अतुलने अभिजीत यांना ऑफिसच्या बाहेर बोलावले आणि त्याच्या हातातील कमरेच्या बेल्टने चार ते पाच वेळा मारहाण केली.

या हल्ल्यात अभिजीत यांच्या कपाळाला जखम झाली आहे.

आरोपीवर गुन्हा दाखल

या घटनेनंतर अभिजीत ऐनपुरे यांनी बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अतुल केसवडविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

 

या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तांबे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *