हिंजवडीत मोबाईल चोरांनी चक्क मोबाईल शॉपी च फोडली , एवढे मोबाईल चोरीला !

0
WhatsApp Image 2024-08-03 at 21.02.31

हिंजवडी येथील मोबाईल शॉपीत घरफोडी – १६ मोबाईल फोन चोरीला

हिंजवडी, पुणे: बावधान येथील जय भवानी नावाच्या मोबाईल शॉपीमध्ये दि. ३१/०७/२०२४ रोजी रात्री १०:०० वाजता ते दि. ०१/०८/२०२४ रोजी सकाळी ०५:०० वाजेच्या दरम्यान घरफोडी झाली आहे. या घरफोडीत अज्ञात इसमांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश करून १,०९,०००/- रुपयांचे एकूण १६ मोबाईल फोन चोरी केले आहेत.

सुरज नागेश हिळी (वय २५ वर्षे), व्यवसायाने व्यापारी, राहणार अडव्होकेट अजित कुलकर्णी फार्म हाऊस, मारी गोल्ड हॉटेलजवळ, पौड रोड, बावधान, ता. मुळशी, जि. पुणे यांनी ही तक्रार नोंदविली आहे. ही घटना दि. ०२/०८/२०२४ रोजी रात्री ११:०७ वाजता नोंदविण्यात आली.

या प्रकरणाची नोंद भारतीय न्याय संहिता कलम ३०५ आणि ३३१ (४) अंतर्गत करण्यात आली आहे. पोलीस अज्ञात इसमांचा शोध घेत आहेत आणि लवकरच त्यांना अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

घरफोडीच्या या घटनेमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *