Corona Virus Update 2023 : पुन्हा एकदा कोरोना विषाणूने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले असून चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा वेग वाढत आहे. त्यामुळे भारतातही कोरोनाची चिंता वाढली आहे, त्यामुळे केंद्र सरकार आणि दिल्ली सरकार पुन्हा एकदा सावध दिसत आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी म्हणजेच आज कोरोनाबाबत तातडीची बैठक बोलावली आहे. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
दिल्लीतील कोरोनाबाबत सद्यस्थिती काय आहे ?
दिल्लीत कोरोना विषाणूची परिस्थिती नियंत्रणात आहे. तर तिकडे दिल्ली सरकारने कोरोनाबाबत जारी केलेल्या अहवालानुसार, गेल्या २४ तासांत कोरोनाचे ७ नवीन रुग्ण समोर आले आहेत. गेल्या 24 तासात 2476 कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून यामध्ये संसर्ग दर 0.26% नोंदवला गेला आहे.