पुणे,दि.जानेवारी,2024 : अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाबद्दल बोलताना ‘प्रभू रामाला सीतेसोबत ठेवा’ अशी इच्छा रामानंद स्वामी यांच्या रामायणातील सिता म्हणजेच दीपिका चिखलीया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे व्यक्त केली आहे. जानेवारीला होणाऱ्या सोहळ्याचे आमंत्रण मिळाल्यावर त्यांनी ही इच्छा व्यक्त केली आहे.
दीपिका चिखलीया यांनी आपल्या रामायण मालिकेतील ‘सिता’चे पात्र साकारून अजूनही सगळ्यांच्या मनात आपले स्थान कायम ठेवले आहे. ‘रामायम’ म्हंटले कि त्यांचा चेहरा डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही.त्यामुळे दीपिका चिखलिया 22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटनाला विशेष अतिथी म्हणुन उपस्थित राहणार आहेत. आपला उत्साह व्यक्त करताना दीपिका म्हणाल्या माझ्यासाठी हा खूप ऐतिहासिक दिवस आहे,वर्षानंतर श्री राम अयोध्येत परतणार आहेत.मी माझ्या आयुष्यातही सीतेची भूमिका साकारली आहे,माझी प्रभू रामावर खूप श्रद्धा आहे. हा क्षण संपूर्ण भारतीयांसाठी खूप भावनिक असणार आहे.परंतु रामासह सीतेची मूर्ती नसल्याचं दुःख आहे. रामजींच्या बाजूला सीतेची मूर्ती असेल असे मला वाटायचे परंतु असे नसल्याची मला खंत आहे.त्यामुळे पंतप्रधानांना अयोध्येत रामाच्या मुर्तीसह सीतेची मुर्ती स्थापन करण्याची विनंती करू इच्छिते असे दीपिका चिखलीया म्हणाल्या.
प्रभू राम व सीता माता यांच्या जीवनाबद्दल सर्वांनाच माहित आहे. 14 वर्षांच्या वनवासानंतर राम – सीता अयोध्येत गेले होते,त्यानंतर परत सीतेला वनवास भोगावा लागला.आता राम मंदिरात जर ‘राम’जीच्या बाजूला ‘सिता’ची मूर्ती असेल तर सर्व महिलांना याचा खुप आनंद होईल अशी भावना दीपिका चिखलीय यांनी व्यक्त केली आहे.